• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
12 February 2026, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागर समुद्रामध्ये झेपावली नवजात कासव पिल्ले

by Ganesh Dhanawade
January 16, 2026
in Guhagar
100 1
11
The baby turtles rushed towards the sea
197
SHARES
562
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 16 :  मकरसंक्रातीच्या मुहूर्तावर गुहागर समुद्रकिनारी संरक्षीत करण्यात आलेल्या अंड्डयांमधून ३३ कासव पिल्लांचा जन्म झाला असून नवजात कासवपिल्ले समुद्राकडे झेपावली आहेत. गुहागर समुद्रकिनारी गतवर्षाप्रमाणे यावर्षीही मोठया प्रमाणात कासव अंड्डयांचे संरक्षण केले जात आहेत. समुद्रकिनारी ६ कासव अंडी उबवीणी केंद्र उभारण्यात आली असून कासव संवर्धनासाठी ११ कासवमीत्रांची नेमणूक केली आहे.The baby turtles rushed towards the sea

गुहागर समुद्रकिनारी गतवर्षाप्रमाणे यावर्षीही मोठया प्रमाणात कासव अंड्डयांचे संरक्षण केले जात आहेत. समुद्रकिनारी ६ ऑलिव्ह रिडले कासव संवर्धन केंद्र उभारण्यात आली  आहेत. कासवांची घरटी शोधून त्यातील अंडी संरक्षित करण्यासाठी ११ कासवमित्रांची नेमणूक केली आहे. हे कासव मित्र साडेसात किलोमीटर समुद्रकिनारी रोज गस्त घालत असतात. दक्षिण कोकण कांदळवन विभाग विभागीय वनअधिकारी कांचन पवार, रत्नागिरी कांदळवन वनपरीक्षेत्र अधिकारी किरण ठाकूर, गुहागरचे वनपाल अमीत निमकर यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक सिद्धेश्वर गायकवाड, कासवमीत्र संजय भोसले व त्यांची ११ कासवमित्रांची टीम कासव संवर्धनाचे काम करत आहे. पाऊस थांबल्यानंतर कासव वीणींचा हंगाम सुरू झाला. दि. १७ नोव्हेंबर २०२५ रोजी गुहागर समुद्रकिनारी १२८ अंड्डयांचे पहिले घरटे मिळून आले होते. सदर अंडी तीन नंबरच्या कासव संवर्धन केंद्रामध्ये संरक्षित करण्यात आली होती. मकरसंक्रातीच्या मुहूर्तावर बुधवारी  (१४ जानेवारी) या घरट्यामधील १२८ अंड्यांपैकी ३३ अंड्यांमधील पिल्लांचा जन्म झाला. या पिलांना ऑलिव्ह रिडले कासवपील्लांना सुरक्षितपणे समुद्रामध्ये सोडण्याची प्रक्रिया पार पडली. The baby turtles rushed towards the sea

यामुळे गुहागर समुद्रकिनारी कासव महोत्सवाला सुरूवात झाली आहे. नवजात कासपील्ले समुद्रामध्ये सोडताना वनरक्षक सिद्धेश्वर गायकवाड, गुहागर नगरपंचायत मुख्याधिकारी स्वप्नील चव्हाण, जिल्हा परिषद बांधकाम शाखा अभियंता मंदार छत्रे, कासवमीत्र संजय भोसले, शार्दुल तोडणकर, साहिल तोडणकर तसेच पर्यटकही उपस्थित होते. The baby turtles rushed towards the sea

Tags: Breaking NewsGuhagarGuhagar NewsKonkanLatest Marathi NewsLatest NewsLocal NewsMarathi NewsNews in GuhagarOlive RidleyThe baby turtles rushed towards the seaTop newsTurltleअंडीऑलिव्ह रिडलेकासवेकोकणगुहागरगुहागर न्युजटॉप न्युजताज्या बातम्याब्रेकिंग न्युजमराठी बातम्यालेटेस्ट अपटेड्सलोकल न्युज
Share79SendTweet49
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.