गुहागर, ता. 15 : अनंत विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेतून गुहागर शहरातील व्याडेश्वर हॉल येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये गुहागर पंचक्रोशीतील तब्बल ८४ जणांनी रक्तदान करून या महाकुंभामधे आपला सहभाग नोंदवला. विशेष म्हणजे या शिबिरामध्ये गुहागर चे गट विकास अधिकारी शेखर भिलारे, गुहागर नगरपंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्वप्निल चव्हाण व गुहागरचे पोलिस उप निरीक्षक संदीप भोपळे हे देखील सहभागी झाले होते. Blood donation camp in Guhagar

या शिबिरासाठी गुहागरच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा नीता मालप तसेच नगरसेवक अमोल गोयथळे, नगरसेविका अनुषा भावे, विशाखा सोमण, शिवसेना तालुका प्रमुख दीपक कनगुटकर, अमरदीप परचूरे यांनी देखील भेट दिली. तसेच या कार्यक्रमासाठी रामानंद संप्रदायाचे जिल्हा निरीक्षक दीपक तावडे, पीठ युवाप्रमुख सुनील वीर, गुहागर तालुका अध्यक्षा धनश्री मांजरेकर, कॅम्प प्रमुख सिद्धेश रहाटे, आशिष शिगवण हे देखील उपस्थित होते. Blood donation camp in Guhagar
