• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
14 January 2026, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

ठेव सुरक्षा व बचतीसाठी डाक विभागाची विशेष मोहीम

by Guhagar News
January 14, 2026
in Ratnagiri
27 1
0
54
SHARES
154
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

रत्नागिरी, ता. 14 : सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात भविष्याची तरतूद, मुलांचे शिक्षण, वृद्धांची जबाबदारी या दृष्टीने बचतीचे महत्व अनन्यसाधारण आहे. आपली बचत सुरक्षित व नियमित परतावा देणारी असणे अत्यंत महत्वाचे आहे. या दृष्टीने पोस्ट खात्यातील बचत हा एक अत्यंत सुरक्षित व खात्रीशीर पर्याय आहे. Postal Department’s special campaign

जनसामान्यांना बचतीचे विविध लाभ मिळावेत या दृष्टीने पोस्ट खात्याकडून वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. त्याचाच एक भाग म्हणून दिनांक 19 जानेवारी ते 24 जानेवारी 2026 या कालावधीमध्ये रत्नागिरी जिल्ह्यामधील सर्व डाक कार्यालयांमध्ये विशेष मोहीम राबवली जात असून या काळात जास्तीत जास्त खाती उघडण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत. १० वर्षांपर्यंतच्या मुलींसाठी एसएसए खाते, गरजेनुसार विविध मुदतीसाठी मुदत ठेव, आवर्ती खाते, पीपीएफ खाते अशा विविध आकर्षक व खातेदारास लाभदायक अशा या विविध योजना पोस्ट खात्याकडून राबवल्या जात आहेत. Postal Department’s special campaign

माहे डिसेंबर २०२५ अखेर पोस्ट खात्याच्या रत्नागिरी विभागामध्ये १०,९१,२७७  एवढी चालू खाती असून आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये एप्रिल २०२५ पासून डिसेंबर २०२५ पर्यन्त एकूण १,२५,५२० एवढी नवीन पोस्ट खाती उघडण्यात आलेली आहेत.परताव्याची नियमितता व पैशांची सुरक्षितता या दृष्टीने डाक खात्याचे स्थान कायमच अग्रणी आहे. तरी सर्वांनी या विविध योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन रत्नागिरी डाक विभागाचे अधीक्षक श्री. डी. एस. कुलकर्णी यांनी केले आहे. Postal Department’s special campaign

पोस्टाच्या विविध बचत योजना व व्याजदर पुढीलप्रमाणे
सेव्हिंग खाते  ४%, १ वर्ष मुदत ठेव ६.०९%, २ वर्ष मुदत ठेव ७.००%, ३ वर्ष मुदत ठेव ७.०१% , ५ वर्ष मुदत ठेव  ७.०५% पाच वर्षे आवर्ती ठेव ६.०७% , ज्येष्ठ नागरिक बचत योजना ८.०२%, मासिक उत्पन्न योजना ७.४%, सुकन्या समृद्धी खाते योजना ८.०२%, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजना (पीपीएफ) ७.०१%, राष्ट्रीय बचत योजना ७.०७%,  किसान विकास पत्र (११५ महिन्यांत परिपक्व होईल) ७.०५%.

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarPostal Department's special campaignटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share22SendTweet14
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.