• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
14 January 2026, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

पतंग उडवताना वीज सुरक्षिततेचे नियम पाळण्याचे महावितरणचे आवाहन

by Guhagar News
January 14, 2026
in Guhagar
25 0
2
Follow electrical safety rules while flying kites
49
SHARES
139
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

रत्नागिरी, ता. 14 : मकरसंक्रांती सणाच्या काळात पतंग उडवण्याचा आनंद घेताना अपघाताच्या घटना टाळण्यासाठी नागरिकांनी वीज सुरक्षिततेचे नियम कटाक्षाने पाळावेत, असे आवाहन महावितरणने केले आहे. Follow electrical safety rules while flying kites

पतंग उडवताना अनेकदा नायलॉन किंवा चायनीज मांजा वापरला जातो. हा मांजा विजेच्या तारांवर अडकला तर शॉर्टसर्किट, वीजपुरवठा खंडित होणे, आग लागणे किंवा जीवितहानीसारख्या गंभीर घटना घडू शकतात तसेच विजेच्या खांबावर, ट्रान्स्फॉर्मरजवळ किंवा उपकेंद्राच्या परिसरात पतंग उडवणे अत्यंत धोकादायक आहे.  Follow electrical safety rules while flying kites

महावितरणकडून अपघात टाळण्यासाठी नागरिकांना पुढील महत्वाच्या सूचना देण्यात येत आहेत. पालकांनी पतंग उडवताना लहान मुलांना विद्युत सुरक्षेची काळजी घेण्याबाबत समजून सांगावे. शक्यतो पालकांनी मुलांसोबत थांबावे. विजेच्या तारांजवळ किंवा खांबावर अडकलेला पतंग काढण्याचा प्रयत्न करू नये. ओले कपडे, सळई वा इतर लोखंडी वस्तू किंवा हाताने विजेच्या तारांना स्पर्श करू नये. नायलॉन वा चायनीज मांजा वापरणे टाळावे, पतंग उडवण्यासाठी मोकळी व सुरक्षित जागा निवडावी. पतंग उडवताना थोडीशी काळजी घेतल्यास अपघात टाळता येऊ शकतात आणि सर्वजण सुरक्षितपणे सणाचा आनंद घेऊ शकतात. वीज सुरक्षितता ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. Follow electrical safety rules while flying kites

आपत्कालीन परिस्थितीत महावितरणच्या नजीकच्या कार्यालयास किंवा २४ तास सेवेत असलेल्या ग्राहक सुविधा केंद्राच्या १८००-२१२-३४३५ किंवा १८००-२३३-३४३५ किंवा १९१२ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. Follow electrical safety rules while flying kites

Tags: Follow electrical safety rules while flying kitesGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share20SendTweet12
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.