गुहागर, ता. 13 : शहरातील लोकनेते स्व.सदानंद आरेकर प्रतिष्ठान गुहागर संचलित कन्हैया प्ले स्कूल, कीर्तनवाडी गुहागर आयोजित बालमहोत्सव 2026 मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात माजी आमदार बेंडल, नातू, केसरकर, माजी सभापती आरेकर, सामाजिक कार्यकर्ते भागडे यांच्या स्मृतींना आदरांजली अर्पन करून करण्यात आला. यावेळी बालगोपालांनी विविध गाण्यांवर नृत्य करून धमाल केली. तसेच जादूगार प्रयोगाचा देखील चिमुकल्यांनी आनंद लुटला. Kanhaiya Play School’s Children’s Festival

या बालमहोत्सवाचे उद्घाटन गुहागर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शेखरजी भिलारे सर यांच्या शुभ हस्ते झाले. भिलारे यांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक केले. यावेळी गुहागर नगरपंचायत मुख्याधिकारी स्वप्निल चव्हाण सर यांनी प्ले स्कूल ने लहान मुलांना उपलब्ध करून दिलेल्या अत्याधुनिक सुविधा याबद्दल प्ले स्कूल च्या उपक्रमांच कौतुक केले. Kanhaiya Play School’s Children’s Festival

या कार्यक्रमात संस्थेचे कार्याध्यक्ष साहिल आरेकर, नगरसेवक राजेंद्र भागडे, कन्हैया प्ले स्कूल कमीटी अध्यक्ष माजी शिक्षण सभापती सौ. सुजाता ताई बागकर, संस्थेच्या महिला अध्यक्षा सौ. स्वाती ताई कचरेकर, नगरसेवक सौरभ भागडे, कन्हैया प्ले स्कूल प्राचार्य राऊत मॅडम, संचालक सिद्धेश आरेकर, माजी बांधकाम सभापती माधव साटले, संज्योती विखारे, उपसरपंच संतोष जोशी, अनंत ताणकर, अन्वीता मांडवकर, गोवलकर मॅडम, सुर्वे मॅडम, शिंदे मॅडम तसेच बालगोपाळ विद्यार्थी, संस्थेचे कर्मचारी वर्ग आणि मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते. Kanhaiya Play School’s Children’s Festival

