• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
13 January 2026, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

स्वीकृत नगरसेवक करिता भाजपाकडून संतोष सांगळे

by Manoj Bavdhankar
January 13, 2026
in Guhagar
54 0
0
Santosh Sangle from BJP for approved corporator
106
SHARES
302
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 13 : गुहागर नगरपंचायतीच्या स्वीकृत नगरसेवक पदासाठी गुहागर भारतीय जनता पार्टीचे तालुका सरचिटणीस  संतोष सांगळे यांच्या नावाची घोषणा भारतीय जनता पार्टी यांच्याकडून करण्यात आली. त्यांनी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात स्वीकृत नगरसेवक पदाचा अर्ज दाखल केला असल्याची माहिती भाजपाचे जिल्हा सरचिटणीस निलेश सुर्वे यांनी दिली. Santosh Sangle from BJP for approved corporator

भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, माजी आमदार डॉक्टर विनय नातू, जिल्हाध्यक्ष सतीश मोरे यांच्या निर्णयानुसार  गुहागर  नगरपंचायतीच्या स्वीकृत नगरसेवक पदासाठी संतोष सांगळे यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. संतोष सांगळे हे गुहागर तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष आहेत.  गुहागर असगोली  कुणबी समाज संघटनेचे कार्याध्यक्ष आहेत. गुहागर शहर विकास आघाडी निर्माण करण्यामागे त्यांचा मोठा मोलाचा वाटा होता. लोकसभा आणि विधानसभा  निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी पक्षाने त्यांच्यावर पक्ष विस्तारक म्हणून जबाबदारी होती. त्यामुळे त्यांच्यावर पक्षाने जबाबदारी देऊन चांगलं काम करण्याची अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त केली आहे. दि. १५ जानेवारी २०२६ रोजी दुपारी २ वाजता  त्यांच्या अधिकृत नावाची घोषणा पिठासीन अधिकारी नगराध्यक्ष सौ नीता मालप  करणार आहेत.  Santosh Sangle from BJP for approved corporator

तरी भारतीय जनता पार्टी च्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि सर्व नगरसेवकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन तालुकाध्यक्ष अभय भाटकर, सरचिटणीस सचिन ओक, गुहागर शहर अध्यश नरेश पवार यांनी केले आहे. Santosh Sangle from BJP for approved corporator

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarSantosh Sangle from BJP for approved corporatorटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share42SendTweet27
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.