गुहागर, ता. 13 : चिपळूण नगर परिषदेत तीन स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती करण्यात येणार असून, यामध्ये शिवसेना, भाजप आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून प्रत्येकी एका नगरसेवकाची नियुक्ती होणार आहे. यासंदर्भात राजकीय वर्तुळात खात्रीशीर माहिती समोर आली आहे. Faisal Kaskar elected as corporator from Ubatha
नगर परिषदेत सर्वात मोठा गट असलेल्या शिवसेनेकडून विकी (विक्रांत) लवेकर, भाजपकडून शितल रानडे, तर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून माजी नगरसेवक आणि शिवसेना नेते आमदार भास्करशेठ जाधव यांचे अत्यंत जवळचे व विश्वासू सहकारी फैसल कास्कर यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. Faisal Kaskar elected as corporator from Ubatha

फैसल कास्कर हे अभ्यासू व अनुभवी नेतृत्व म्हणून ओळखले जातात. यापूर्वी त्यांनी नगरसेवक म्हणून प्रभावी कामगिरी बजावली असून, एक यशस्वी व्यावसायिक म्हणूनही त्यांची ओळख आहे. आमदार भास्करशेठ जाधव यांचे ते अत्यंत विश्वासू सहकारी मानले जातात. Faisal Kaskar elected as corporator from Ubatha
फैसल कास्कर यांच्या नावावर शिक्कामोर्तब होताच राजकीय, सामाजिक व व्यावसायिक क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या निवडीचे सर्वत्र स्वागत केले जात आहे. तीनही पक्षांच्या या नियुक्त्यांमुळे चिपळूण नगर परिषदेतील राजकीय समीकरणांना नवे वळण मिळणार असल्याची चर्चा सुरू आहे. Faisal Kaskar elected as corporator from Ubatha
