गुहागर, ता. 12 : जीवनदान महाकुंभ २०२६ अंतर्गत रामानंद संप्रदाय, तालुका सेवा समिती गुहागर यांचे वतीने उद्या दिनांक १३ जानेवारी २०२६ रोजी व्याडेश्वर मंदिर हॉल, गुहागर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. Blood donation camp in Guhagar
रक्तदान शिबिरासाठी जगदगुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी- दक्षिणपीठ नाणिजधाम व पिठाचे उत्तराधिकारी प.पू.कानिफनाथ महाराज यांचा प्रेरणेने सामाजिक उपक्रमांतर्गत समाजातील मायक्रोसाइटिक ॲनिमिया, सिकलसेल, थॅलेसिमिया, हिमोफिलिया, ब्लड कॅन्सर, किडनी फेल्युअर अशा गंभीर आजारांशी झुंजणाऱ्या रुग्णांकरीता दिनांक ०४.०१.२०२६ ते १८.०१.२०२६ या कालावधीत जीवनदान महाकुंभाचे आयोजन करण्यात आलेले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही, १५ दिवस चालणाऱ्या या महाकुंभाद्वारे रुग्णांना विनामूल्य रक्त उपलब्ध करुन देण्याचा उपक्रम संस्थानातर्फे राबविला जात आहे. Blood donation camp in Guhagar

तरी आपण या रक्तदान शिबीरामध्ये सहभागी होवून सर्वश्रेष्ठ दानाचे भागीदार व्हावे, तसेच आपले सहकारी व मित्रपरिवार यांनाही या सर्वश्रेष्ठ दानाचे भागीदार होण्याचे आवाहन रामानंद संप्रदाय रत्नागिरी, जिल्हा निरिक्षक, श्री.दिपक शांताराम तावडे यांनी केले आहे. Blood donation camp in Guhagar
