गुहागर, ता. 10 : तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शीर नं.४ या शाळेची लोकसभातून रंगरंगोटी करण्यात आली आहे. या शाळेला लोकसहभागातून अमरज्योती विकास मंडळ फणसवाडी, माजी विद्यार्थी संघटना वरची ठोंबरेवाडी, माजी विद्यार्थी संघटना साफसणवाडी, शीर गावचे तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष गणपत ठोंबरे यांनी आर्थिक सहाय्य केले. School coloring through public participation

यासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे शांताराम ठोंबरे, गणपत ठोंबरे, ओंकार ठोंबरे, निलेश ठोंबरे, रमेश आंबेकर, सुनील आंबेकर या सर्वांनी विशेष सहकार्य केले. या सर्व देणगीदारांचे जिल्हा परिषद मराठी शाळा शीर नं. ४ या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. तृप्ती तुकाराम निवाते, सहकारी शिक्षिका सौ. प्रेरणा प्रदीप भंडारी यांनी आभार मानून धन्यवाद दिले. School coloring through public participation
