गुहागर, ता. 10 : तालुक्यातील निर्मल ग्रामपंचायत तळवली येथे वैद्यकीय अधिकारी डॉ.सुप्रिमकुमार कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली तळवली येथील सभागृहात आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी फिरत्या आरोग्य पथक तळवली येथे दाखल झाले होते. तळवली ग्रामपंचायतीच्या सरपंच मयुरी शिगवण यांच्या प्रमुख उपस्थितीत आरोग्य तपासणी शिबीरास प्रारंभ करण्यात आला. Health check-up at Talavali
यावेळी आरोग्य तपासणीमध्ये, HB, तपासणी, आयुष्यमान कार्ड, आभाकार्ड, त्याचप्रमाणे कीटकजन्य आजाराविषयी मौलिक माहिती ग्रामस्थांना कीटक शास्त्रज्ञ परिक्षीत वाडकर यांनी दिली. त्यानंतर इकोफ्रेंडली डास निर्मूलन याबद्दल माहिती देण्यात येऊन या फिरत्या वैद्यकीय आरोग्य पथकाचा आरोग्य तपासणीचा लाभ बहुसंख्याने महिला, पुरुष ग्रामस्थांनी घेतला. Health check-up at Talavali

या आरोग्य तपासणीच्या वेळी समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.राजेश मोहिते, डॉ.वैभव तोंडे, तसेच फार्मासिस्ट प्रज्योत नरोटे, तालुका कीटक शास्त्रज्ञ परिक्षीत वाडकर, आरोग्य सेवक विकास दूपटे, ग्राम महसूल अधिकारी हनुमंत भिसे, आशा गटप्रवर्तक, संचित म्हसकर, आशा सेविका निकिता पवार, सायली कळंबाटे, शितल सांगळे तसेच फिरते पथकाचे ड्रायव्हर, शशिकांत जगधने आदींनी या आरोग्य पथकाचे काम पाहिले. सदर आरोग्य तपासणी कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला. Health check-up at Talavali
