गुहागर, ता. 06 : गुहागर नगर पंचायतीमध्ये युतीच्या माध्यमातून दैदीप्यमान यश प्राप्त केल्यानंतर माजी आमदार डॉ.विनय नातू यांच्या नेतृत्वाखाली गुहागर तालुक्यातील ५ जिल्हा परिषद गट आणि १० पंचायत समिती गणातील विजयासाठी भारतीय जनता पार्टी सज्ज झाली आहे. माजी आमदार डॉ.विनय नातू, जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, गुहागर नगरपंचायत प्रभारी म्हणून यशस्वी काम करणारे जिल्हा सरचिटणीस निलेश सुर्वे, तालुका अध्यक्ष अभय भाटकर, तालुका सरचिटणीस सचिन ओक, जिल्हा ओबीसी मोर्चा अध्यक्ष मंगेश रांगळे, तालुक्याचे कोषाध्यक्ष साईनाथ कळझुणकर, जिल्हा उपाध्यक्ष संतोष जैताकर यांच्या प्रमुख नियोजनात आणि उपस्थितीत गुहागर तालुक्यामध्ये ५ जिल्हा परिषद गट आणि १० पंचायत समिती गणाच्या भारतीय जनता पार्टी बुथ कार्यकर्त्यांच्या सभा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या. The Bharatiya Janata Party is ready
देशांमध्ये नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महायुतीचे सरकार अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत असताना याचा फायदा गुहागर तालुक्यामध्ये पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये घ्यायचे भारतीय जनता पार्टीने प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात नक्की केले आहे. त्यानुसारच डॉक्टर नातूनी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कार्यकर्त्यांच्या बैठकांचा सपाटा लावला आहे. The Bharatiya Janata Party is ready

गुहागर तालुक्यामधील पडवे, वेळणेश्वर, कोंडकारुळ, शृंगारतळी आणि असगोली जिल्हा परिषद गट या बरोबरच पडवे, पाचेरी सडा, वेळणेश्वर, शिर, कोंडकारुळ, मळण, शृंगारतळी, तळवली, असगोली आणि अंजनवेल या दहा पंचायत समिती गणाच्या बुथ कार्यकर्त्यांच्या सभा मोठ्या उपस्थितीत, उत्साहात संपन्न झाल्या असून जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीला सामोरे जाण्याची भाजपाची परिपूर्ण तयारी झाली आहे. The Bharatiya Janata Party is ready
असे असले तरी देशात आणि राज्यात महायुतीचे सरकार असल्याने महायुतीलाच प्राधान्य देणार असल्याचे यावेळी माजी आमदार डॉ.विनय नातू यांनी सांगितले आहे. मात्र भारतीय जनता पार्टी कोणत्याही जिल्हा परिषद गटात, पंचायत समिती गणात लढत देण्यासाठी तयार असल्याचे यावेळी जिल्हा सरचिटणीस निलेश सुर्वे यांनी सांगितले आहे. The Bharatiya Janata Party is ready