गुहागर ता. 05 : महाराष्ट्र शिक्षक परिषद रत्नागिरी शाखेचा वार्षिक मेळावा गुहागर मधील पाटपन्हाळे हायस्कूलमध्ये नुकताच संपन्न झाला. या मेळाव्यानिमित्ताने गुणवंत शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये रत्नागिरी तालुक्यातील श्री भागोजी दिगंबर किंजळे, नाणीज हायस्कूल व सौ सानिका नितीन पंडित बसणी हायस्कूल यांचा गुणवंत शिक्षक म्हणून गौरव करण्यात आला. Maharashtra Teachers’ Council Annual Meeting

या वेळेला माजी आमदार विनयजी नातू, महाराष्ट्र शिक्षक परिषदेचे अध्यक्ष श्री. वेणूनाथ कडू, माजी शिक्षक आमदार भगवान आप्पा साळुंखे, शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष श्री. ज्ञानेश्वर शिंदे, कार्याध्यक्ष श्री किरण देशपांडे, सचिव श्री पाचकुडवे सर आणि रत्नागिरी तालुकाध्यक्ष श्री राजेश आयरे हे उपस्थित होते. Maharashtra Teachers’ Council Annual Meeting
