गुहागर, ता. 02 : रत्नागिरी जिल्हा परिषद पुरस्कृत पंचायत समिती गुहागर तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ गुहागर पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी श्री गळवे साहेब यांच्या, मार्गदर्शनाखाली व प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. पालपेणे हायस्कूल वरदान क्रीडा नगरी येथे संपन्न झालेल्या क्रीडा महोत्सवामध्ये कबड्डी, खो-खो, लंगडी, क्रिकेट, लांब उडी, उंच उडी ,धावणे, थाळीफेक, गोळा फेक, इत्यादी क्रीडा प्रकार खेळविण्यात आले. Sports competition awards ceremony
विविध खेळ प्रकारामध्ये यजमान गुहागर, आबलोली, चिखली, अडूर या चार बीटातील संघ या स्पर्धांमध्ये सहभागी झाले होते. त्यावेळी मार्गदर्शन करताना गटशिक्षणाधिकारी गळवे साहेब म्हणाले की, अत्यंत नियोजनबद्ध व खेळीमेळीच्या वातावरणामध्ये तालुकास्तरीय क्रीडा संपन्न झाल्या. सदर स्पर्धेमध्ये भोजन व्यवस्था, बक्षिसे, नियोजन करिता केंद्रीय प्रमुख व शिक्षक यांनी मोलाचे सहकार्य केले.सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते विजेत्या स्पर्धकांना भेटवस्तू व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. Sports competition awards ceremony

यावेळी गट शिक्षणाधिकारी गळवे साहेब, शिक्षण विस्तार अधिकारी वळवी साहेब, केंद्रप्रमुख आरोही शिगवण मॅडम, केंद्रप्रमुख खर्डे साहेब, शिक्षण विस्तार अधिकारी श्री चिपळूणकर साहेब ,केंद्रप्रमुख श्री माने सर अडूर, श्री कांबळे सर निगुंडळ, पालपेणे वरदान हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री हसबे सर, केंद्रप्रमुख श्री वसावे सर, जिल्हा शिक्षक पतपेढीचे उपाध्यक्ष श्री अरविंद पालकर सर, गुहागर तालुका क्रीडा संयोजन समिती पदाधिकारी व सर्व सदस्य सर्व शिक्षक संघटनांचे पदाधिकारी व प्रतिनिधी जिल्हास्तरीय पंच, प्रतिष्ठित नागरिक श्री घोरपडे, श्री.दिनेश जानवळकर, विविध खेळांचे विभाग प्रमुख व्यवस्थापक पंच, मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक, शिक्षण सेवक, पालक, शाळा व्यवस्थापन समिती, अध्यक्ष, सरपंच व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश पाटील सर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री प्रभू हंबर्डे सर यांनी केले. Sports competition awards ceremony
