गुहागर, ता. 02 : तालुक्यातील भातगाव येथील भारतीय आयुर्विमा महामंडळाचे ( एलआयसी ) प्रतिनिधी धीरज भागा मुंडेकर यांनी सन 2025-26 सालाकरिता चिपळूण शाखेतील दुसरा MDRT होण्याचा मान मिळाला आहे. कोल्हापूर डिव्हिजन मधील या वर्षातील 15 वा MDRT होण्याचा सन्मान मिळाला. यामुळे पुन्हा एकदा अमेरिकेला होणाऱ्या कॉन्फरन्ससाठी उपस्थित राहण्याची संधी प्राप्त झाली आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. MDRT Award to Dheeraj Mundekar

विमा प्रतिनिधी धिरज मुंडेकर भातगाव सारख्या दुर्गम भागात उत्तम आयुर्विमा सेवा देण्याचे काम करत आहेत. श्री. मुंडेकर म्हणाले की, सतत अधिकाधिक लोकांना भेटून उत्तम सेवा देताना विमा संरक्षणही वाढवून देण्यात यशस्वी झाल्याने हे शक्य झाले. यासाठी मेहनत तर आहेच. पण विमेदारांचे प्रेम आणि अखंड पाठिशी असलेला आशिर्वाद यामुळे प्रचंड ऊर्जा मिळाली. या पुढे ही जीवन विमा आणि आरोग्य विमा मध्ये उत्तम सेवा देत राहीन. MDRT Award to Dheeraj Mundekar
या यशात माझे कुटुंब, मुंडेकर विमा सेवा सर्व सहकारी, चिपळूण ब्रांच मॅनेजर श्री. बालाजी वाघमारे साहेब आणि सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच माझे विकास अधिकारी श्री शशिधर कान्हेरे साहेब, एजंट होमचे सर्व सहकारी यांचा मोलाचा वाटा आहे. MDRT Award to Dheeraj Mundekar

