लाकडी साकव प्रमुख आकर्षण; स्पर्धक संघांना नोंदणी करण्याचे आवाहन
गुहागर, ता. 30 : शहरातील गुलजार क्रिकेट क्लबच्या वतीने जहुर स्मृती चषक 2026 या रत्नागिरी जिल्हा एक ग्रामपंचायत ओव्हर आर्म क्रिक्रेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या क्रिकेट स्पर्धा दि. 22 जानेवारी ते 26 जानेवारी 2026 या कालावधीत वरचापाट मोहल्ला येथे भरविण्यात येणार आहेत. तरी क्रिकेट संघांनी या स्पर्धेत भाग घ्यावा, असे आवाहन गुलजार क्रिकेट क्लबने केले आहे. Gulzar Cricket Club Tournament

गुलजार क्रिकेट क्लबच्या स्पर्धेचे आकर्षण असते ते साकवाचे. दरवर्षी आयोजकांना मैदानात येण्यासाठी नदीवर लाकडी साकव बांधावा लागतो. या साकवाला विद्युत रोषणाईने आकर्षक करतात. त्यामुळे या स्पर्धेची वेगळी ओळख बनली आहे. सायंकाळी नदीच्या प्रवाहात साकवाचे पडणारे प्रतिबिंब मोहक असते. Gulzar Cricket Club Tournament

या स्पर्धेतील विजेत्या संघाला रोख रु. 25 हजार व आकर्षक चषक देण्यात येणार आहे. तर उपविजेत्या संघाला रोख रु. 15 हजार व आकर्षक चषक देण्यात येणार आहे. याशिवाय मालिकावीर, सामनावीर, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक व इतर आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. स्पर्धेची प्रवेश फी रु. 1900/- असून चेंडू फी रु. 100/- आहे. Gulzar Cricket Club Tournament announced
तरी संघांनी नाव नोंदणी करण्यासाठी वसीम झोंबडकर (7083626995), तवक्कल माहिमकर (9637631488), नियाज तुरुक (8655394583), मुजीब बालाभाई (9975270833), साहिम सय्यद (8208153092)या कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा. असे आवाहन गुलजार क्रिकेट क्लबने केले आहे. Gulzar Cricket Club Tournament
