गुहागर, ता. 30 : गुहागर तालुक्यातील उमराठ गावाचे सुपुत्र गुहागर एसटी आगारातील वाहतूक नियंत्रक अनिल नारायण पवार गेले अनेक वर्ष प्रवाशांची निस्वार्थीपणे सेवा करत आहेत. अत्यंत शांत स्वभाव असलेल्या पवार हे गुहागर आगारातून निवृत्त होत आहेत. Anil Pawar retired from Guhagar Agar
अनिल पवार यांची 1992 रोजी एसटी महामंडळात वाहक म्हणून रूजु झाले. आज त्यांची सेवा निवृत्ती 1992 ला वाहक म्हणून नियुक्ती झाल्यावर त्यांनी चिपळूण, देवरुख, लांजा रत्नागिरी व गुहागर आगरात आपली वाहक म्हणून सेवा बजावली. त्यानंतर 2021 रोजी त्यांचे वाहतूक नियंत्रक पदावर बढती मिळाली. या भरतीनंतर ते एक वर्ष दापोली तालुक्यातील दाभोळ येथे वाहतूक नियंत्रक म्हणून काम बघत होते. त्यानंतर त्यांची गुहागर आगारात वाहक नियंत्रक म्हणून नेमणूक झाली. एसटी महामंडळाचे उत्पन्न वाढीचा सन्मान त्यांना गुहागर आगारातून मिळालेला होता. तसेच गुहागर आगारात कामगार संघटनेचे अध्यक्षपदी, सचिव पदी व खजिनदारपदी त्यांनी काम केलेले आहे. सद्यस्थितीला ते एसटी कामगार संघटनेचे खजिनदार आहेत. Anil Pawar retired from Guhagar Agar
अनिल पवार हे तालुक्यातीलच रहिवासी असल्यामुळे त्यांचा प्रचंड जनसंपर्क तालुक्यात आहे. एसटीने एखादा प्रवास करायचा असेल आरक्षणाचे काम असेल किंवा बसण्यासाठी जागा हवी असेल तर आवर्जून पहिल्यांदा अनिल पवार हेच नाव अनेकांच्या तोंडात यायचं त्याप्रमाणे ते कामही करायचे अत्यंत शांत स्वभाव असलेल्या पवार यांचा आज गुहागर आगारातून निवृत्त होत आहेत. Anil Pawar retired from Guhagar Agar
गुहागर आगरात काम करत असताना त्यांची आपल्या गावाची सुद्धा तितकेच जवळचे नाते आहे. उमराट हेदवी नवलाई देवस्थानचे त्यांनी दहा वर्षे अध्यक्ष पद भूषवले तर उमराठ नवलाई देवस्थानचे बारा वर्षे ते अध्यक्ष म्हणून पदभार आहे. Anil Pawar retired from Guhagar Agar
