गुहागर आगाराच्या वाहकाचा बेजबाबदारपणा
गुहागर, ता. 26 : गुहागर आगारातील गाडी नंबर एम. एच. १४ बी टी २६७२ स्वारगेट गुहागर एसटी बस नंबर २९ चे आरक्षण होते. सदर एसटी ही पहाटे ४:५५ वाजता चिपळूण डेपो मध्ये दाखल झाली. यावेळी देविका बाथरूमला जाण्यासाठी तिचे प्रवासी बॅग गाडीतच ठेवून उतरली होती. ती पुन्हा येईपर्यंत एसटीचे वाहक ए .ओ. राठोड यांनी तिची वाट न पाहता व कोणतेही खातरजमा न करता गाडी गुहागरकडे मार्गस्थ केली. Carrier’s irresponsibility
गुहागर येथील देविका विनोद घाडे ही युवती स्वारगेट गुहागर एसटी बसने प्रवास करत होती. सदर एसटी चिपळूण डेपो मध्ये दाखल झाली असता देविका ही बाथरूमला जाण्यासाठी तिचे प्रवासी बॅग गाडीतच ठेवू ठेवून उतरली होती. ती पुन्हा येईपर्यंत एसटीचे वाहक ए .ओ. राठोड या वाहकाने तिची वाट न पाहता व कोणतेही खातरजमा न करता गाडी गुहागर कडे मार्गस्थ केली. Carrier’s irresponsibility

यावेळी तब्बल एक तास देविका पहाटे चिपळूण डेपो मध्ये बसून राहिली. व तिथून तिची आई श्रद्धा घाडे हिला फोन करून घडलेला सगळा प्रकार सांगितला. याबाबत तिची आई श्रद्धा घाडे यांनी एसटी डेपो मध्ये जाऊन तक्रार करून वाहकालाही जाब विचारला असता वाहक ए .ओ. राठोड यांनी उडवा उडवीची उत्तरआणि असभ्य वागणूक दिली. या सगळ्या प्रकारामुळे श्रद्धा घाडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष साहिल आरेकर यांच्याशी संपर्क साधला. यावेळी साहिल आरेकर यांनी आगार प्रमुख अशोक चव्हाण यांच्या कार्यालयामध्ये जाऊन लेखी तक्रार दिली. व या सगळ्या प्रकरणाचा सखोल चौकशी करावी व वाहकावर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी केली. Carrier’s irresponsibility
यावेळी गुहागर आगार प्रमुख अशोक चव्हाण यांनी सांगितले की, वाहक जर दोषी असेल तर त्यावर योग्य कारवाई करण्यात येईल. या सर्व प्रकरणाचा लवकरच अहवाल प्राप्त होईल. असे सांगितले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शहर प्रमुख मंदार कचरेकर, नवनिर्वाचित नगरसेवक सौरभ भागडे, आर्यन वराडकर व आदी कार्यकर्ते उपस्थित होते. Carrier’s irresponsibility
