गुहागर, ता. 26 : हिंदू भाविक गुरव ज्ञाती समाज गुहागर तालुका आयोजित गुहागर तालुका मर्यादित गुरव प्रीमियर लीग (पर्व पाचवे) भव्य दिव्य ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धा उद्या शनिवार दिनांक २७ आणि रविवार दिनांक २८ डिसेंबर २०२५ रोजी गुहागरची ग्रामदेवता श्री भैरी व्याघ्रांबरी मंदिर शेजारी, भाटावन मैदान गुहागर, गुरववाडी येथे आयोजित करण्यात आलेली आहे. Gurav Premier League Cricket Tournament at Guhagar
शनिवार दिनांक २७ रोजी सकाळी ८ वा. उद्घाटन सोहळा त्यानंतर सकाळी ८:३० वा. साखळी सामन्यांना सुरुवात होईल. रविवार दिनांक २८ रोजी साखळी सामने, अंतिम सामना सायंकाळी ५ वा. व त्यानंतर बक्षीस समारंभ होणार आहे. तरी या क्रिकेट स्पर्धेसाठी सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन अध्यक्ष हिंदू भाविक गुरव ज्ञाती समाज गुहागर तालुका यांनी केले आहे. Gurav Premier League Cricket Tournament at Guhagar
