गुहागर, ता. 26 : गुहागर बीट अंतर्गत गुहागर, अंजनवेल ,साखरी बुद्रुक व पाटपन्हाळे या केंद्रांचा समावेश असलेल्या गुहागर बीट स्तरीय क्रीडा स्पर्धा गुहागर जय परशुराम क्रीडा नगरी येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाल्या. सदर स्पर्धांमध्ये कबड्डी, लंगडी, खोखो, लांब उडी, उंच उडी, गोळाफेक, थाळीफेक, धावणे, क्रिकेट इत्यादी खेळ प्रकारांचा समावेश करण्यात होता. Sports competition prize distribution
बक्षीस वितरण कार्यक्रमासाठी नगरीचे मालक व प्रतिष्ठित व्यावसायिक श्री केदार खरे, बीट विस्तार अधिकारी श्री महेंद्र वळवी, अंजनवेल केंद्राच्या केंद्रप्रमुख आरोही शिगवण मॅडम, गुहागर केंद्राचे केंद्रप्रमुख ईश्वर वसावे, शिक्षक पातपेढीचे उपाध्यक्ष अरविंद पालकर ,संचालक चंद्रकांत झगडे, माजी उपाध्यक्ष सुभाषजी गमरे ,अखिल प्राथमिक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष डॉ मनोज पाटील, जुनी पेन्शन शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष अमोल धुमाळ ,शिक्षक नेते गणपत निंबरे ,राज्य पंच प्रभू हंबर्डे, गुहागर केंद्र मुख्याध्यापक सौ मनीषा शिंदे, नेहा जोगळेकर ,ईश्वर हलगरे ,श्री गणेश विचारे ,नदीम कोतवडेकर, अंजनवेल केंद्र मुख्याध्यापक निलेश खामकर, रमेश शिंदे , सर्व मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक ,शिक्षण सेवक ,सर्व स्पर्धक व प्रेक्षक बहुसंख्येने उपस्थित होते .सर्व विजेते व उपविजेते संघांना व वैयक्तिक स्पर्धेतील विजेते व उपविजेते स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते चषक प्रशस्तीपत्रक व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. Sports competition prize distribution

क्रीडा स्पर्धांचा निकाल
सांघिक –
मोठा गट मुलगे कबड्डी विजेता केंद्र गुहागर, उपविजेता केंद्र पाटपन्हाळे, मोठा गट खोखो विजेता पाटपन्हाळे, उपविजेता साखरे बुद्रुक, मोठा गट मुली कबड्डी विजेता पाटपन्हाळे उपविजेता गुहागर, मोठा गट मुली खो-खो विजेता पाटपन्हाळे, उपविजेता अंजनवेल, लंगडी मोठा गट मुली विजेता पाटपन्हाळे, उपविजेता गुहागर, लहान गट मुलगे कबड्डी विजेता अंजनवेल, उपविजेता गुहागर, खो खो लहान गट मुलगी विजेता अंजनवेल, उपविजेता गुहागर, लहान गट मुली कबड्डी विजेता संघ गुहागर, उपविजेता साखरे बुद्रुक, लहान गट खो खो मुली विजेता पाटपन्हाळे, उपविजेता गुहागर, लहान गट मुली लंगडी विजेता पाटपन्हाळे उपविजेता साखरी बुद्रुक Sports competition prize distribution
वैयक्तिक –
लहान गट मुलगे पन्नास मीटर धावणे विजेता स्वरूप भुवड, उपविजेता सोहम दुर्गुळे, लांब उडी स्वरूप भुवड द्वितीय साध्य सोलकर, उंचवडी शौर्य पाते उपविजेता हरीश पालकर, थाळीफेक सलील म्हस्कर उपविजेता निल पड्याळ, गोळा फेक प्रतीक मस्कर उपविजेता समर भरवणे, मोठा गट मुली 100 मीटर धावणे विजेता पायल घाणेकर उपविजेता मैथिली दंडणे ,लांब उडी जानवी पाते उपविजेता सोनाक्षी कातकर, उंचवडी पायल घाणेकर उपविजेता जानवी पाते ,थाळी फेक सोनाक्षी कातकर उपविजेता मैथिली दणदणे ,मोठा गट मुलगे शंभर मीटर धावणे विजेता श्रवण रोहीलकर उपविजेता विरंग मांडवकर ,उंचवडी श्रवण नवनाथ रुईकर विजेता तह कोतवडेकर ,उपविजेता उंचवडी विजेता अर्णव पावसकर उपविजेता विरंग मांडवकर, थाळीफेक विजेता आदर्श जावळे उपविजेता अद्वैत गाडेकर, गोळाफेक विजेता श्रवण रोहीलकर उपविजेता शुभम जावळे लहान गट ,मुली 50 मीटर धावणे आरोही शितप विजेता, उदा पंछी उपविजेता, लांब उडी ईश्वरी गुळेकर प्रथम, पूर्वी घाणेकर उपविजेता, उंच उडी नेहा कोळंबे प्रथम, आयेशा हुसेन द्वितीय थाळीफेक नेहा कोळंबे प्रथम वैदेही मोरे द्वितीय .बक्षीस वितरण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ईश्वर हलगरे सर यांनी केले. Sports competition prize distribution
