गुहागर, ता. 25 : एज्युकेशन सोसायटीचे श्री देव गोपाळ कृष्ण माध्यमिक विद्या मंदिर सदानंद सुदाम पाटील शास्त्र, श्री महेश जनार्दन भोसले वाणिज्य कै. विष्णुपंत पवार कला व कनिष्ठ महाविद्यालय गुहागर.मधील इयत्ता दहावीत शिकणारी कुमारी रेइशा विरेंद्र चौघुले हिची सर्वोत्तम विद्यार्थी गोडबोले पुरस्कारासाठी निवड झाली आहे. Reisha Choughule gets Student Godbole Award
‘चतुरंग प्रतिष्ठान’ तर्फे दिल्या जाणाऱ्या सर्वोत्तम विद्यार्थी गोडबोले पुरस्कारासाठी ५९ कोकण शाळांतील एकूण २४५ विद्यार्थ्यांचे ग्रुप इंटरव्ह्यू पार पडले. या विद्यार्थ्यांमधून ३६ शाळांतील ३६ विद्यार्थ्यांची निवड सर्वोत्तम विद्यार्थी गोडबोले पुरस्कारासाठी करण्यात आली आहे. Reisha Choughule gets Student Godbole Award
यामध्ये गुहागर एज्युकेशन सोसायटी व श्रीदेव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय गुहागर विद्यार्थिनी रेईशा चौघुले तिची निवड करण्यात आली. तिची निवड झाली म्हणून गुहागर हायस्कूलचे मुख्याध्यापक सुधाकर कांबळे व उपमुख्याध्यापिका सुजाता कांबळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी पर्यवेक्षिका सोनाली हळदणकर , गायत्री कानगुटकर, सुचिता ठाकूर, राधा शिंदे, कृपाल परचुरे, निलेश गोयथळे, मनीषा सावंत, मीनल खानविलकर व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. Reisha Choughule gets Student Godbole Award
