• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
22 December 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागरच्या निवडणुकीतील लक्षवेधी लढती

by Guhagar News
December 21, 2025
in Guhagar
261 3
0
Noteworthy contests from Guhagar election

Noteworthy contests from Guhagar election

513
SHARES
1.5k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

Noteworthy contests from Guhagar election

गुहागर नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये लक्षवेधी अशा काही घटना आहेत. गुहागर न्यूजच्या वाचकांसमोर या वेचक वेधक घटना आम्ही ठेवत आहोत.

गुहागर नगरपंचायतीमधील सर्वात मोठा विजय
प्रभाग 11 मध्ये शिवसेनेचे सुचित साटले (201 मते) यांनी 175 मतांनी विजय मिळविला. Noteworthy contests from Guhagar election

गुहागर नगरपंचायतीत बाप बेट्याचा विजय

गुहागर नगरपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेना भाजप युतीचे उमेदवार राजेंद्र भागडे हे प्रभाग क्र. 13 मधुन विजयी झाले. तर त्यांचा मुलगा सौरभ भागडे हे राष्ट्रवादीचे उमेदवार प्रभाग 14 मधुन विजयी झाले. दोन पक्षातून उभे असलेले बाप बेटे विजयी झाले आहेत. प्रभाग 13 मध्ये शिवसेना भाजप युतीकडून राजेंद्र भागडे हे उमेदवार होते. त्यांना 177 मते मिळाली. या ठिकाणी त्यांच्या विरोधात केवळ शिवसेना उबाठाचे सुजल होळंब हे एकमेव उमेदवार होते. दुरंगी लढतीत सुजल होळंब (19 मते) यांचा 158 मतांनी पराभव केला. प्रभाग 14 मध्ये (प्रभाग 13 मधील) शिवसेनेचे विजयी उमेदवार राजेंद्र भागडे यांचे पुत्र सौरभ भागडे राष्ट्रवादीचे उमेदवार होते. त्यांनी भाजप सेना युतीचे संजय मालप (112) यांचा पराभव केला. Noteworthy contests from Guhagar election

प्रभाग 14 मध्ये उबाठाला 1 मत

गुहागर नगरपंचायतीच्या निवडणुकीत प्रभाग 14 मधील पराभुत उमेदवार संगिता संजय वराडकर यांना केवळ 1 मत मिळाले आहे. या प्रभागात शिवसेना उबाठाला उमेदवार मिळत नव्हता. त्यामुळे शिवसेना उबाठाने प्रभाग 17 मधील कार्यकर्ती सौ. संगिता वराडकर यांना प्रभाग 14 मधुन उमेदवारी दिली. शिवसेना उबाठा पक्षाचे मशाल हे चिन्ह असल्यामुळे किमान त्या प्रभागातील पक्ष कार्यकर्ते संगीता वराडकर यांना मत देतील अशी अपेक्षा होती. मात्र प्रभागाबाहेरील उमेदवाराला मतदारांनी नाकारले. मिळालेले येथे शिवसेना उबाठा पक्षाला केवळ एक मत मिळाल्याने पक्ष कार्यकर्ते निराश झाले आहेत. Noteworthy contests from Guhagar election

2 नगरसेवक पुन्हा नगरपंचायतीत

गुहागर नगरपंचायतीच्या 2018 ते 2022 या पाच वर्षांच्या कालावधीत उमेश भोसले, अमोल गोयथळे आणि सौ. वैशाली मालप हे नगरसेवक होते. हे तिन्ही नगरसेवक पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात होते. आज झालेल्या निवडणुकीत या तिघांपैकी अमोल गोयथळे आणि उमेश भोसले हे दोन्ही नगरसेवक विजयी झाले आहेत. तर मागील कारकिर्दीत बांधकाम सभापती असलेल्या सौ वैशाली मालप यांना मात्र पराभवाचा धक्का बसला आहे.  Noteworthy contests from Guhagar election

प्रभाग 8 मध्ये नोटाला नाकारले

गुहागर नगरपंचायतीच्या प्रभाग 8 मध्ये 231 मतदारांनी मतदान केले होते. या 231 मतदारांनी नोटाला (वरीलपैकी एकही नाही) नाकारले आहे. खरतरं या सर्व मतदारांचे अभिनंदनच केले पाहीजे. आपल्याकडे लोकशाही आहे. लोकशाहीमधील निवडणूक प्रक्रियेत उभे रहाणारे सर्वच उमेदवार त्या पदासाठी पूर्णपणे योग्य असतील असे नाही. त्यामुळे असलेल्या पर्यांयांमध्ये जो उत्तम पर्याय आहे तो लोकांनी निवडावा असे अपेक्षित असते. परंतू वरील पैकी कोणीही नाही या पर्याय निवडून अनेक मतदार आपले मत फुकट दवडतात. सामाजिक जिवनातही असे प्रसंग अनेकवेळा समोर येतात ज्यावेळी आपल्याला आपले मत व्यक्त करावे लागते. त्याच मताप्रमाणे सर्व काही होत नसते. त्यामुळे नोटाचा पर्याय वापरु नये असे अनेक जाणकार सांगतात.
गुहागर नगरपंचायतीच्या निवडणुकीत एकूण 4486 मतदारांनी सहभाग घेतला. त्या तुलनेत नोटाचा पर्याय वापरणाऱ्यांची संख्याही खूपच कमी आहे. हे देखील लक्षणीय आहे. प्रभाग निहाय झालेल्या मतदानात नोटाला मिळालेली मते फक्त 41 म्हणजे 0.91 टक्के आहेत. नगराध्यक्ष पदासाठी झालेल्या मतदानात नोटाला मिळालेली मते 29 म्हणजे 0.65 टक्के आहेत. Noteworthy contests from Guhagar election

निसटता पराभव

गुहागर नगरपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेना उबाठा पक्षाच्या तीन उमेदवारांना निसटता पराभव स्विकारावा लागला आहे. यामध्ये प्रभाग क्र. 7 मधील सौ. प्रगती वराडकर 6 मतांनी पराभूत झाल्या. प्रभाग क्र. 8 मधील सौ. रिया गुहागरकर या 5 मतांनी पराभूत झाल्या. तर प्रभाग 16 मधील उमेदवार राज विखारे 4 मतांनी पराभूत झाले. Noteworthy contests from Guhagar election

मनसेचा नगरसेवक विजयी

गुहागर नगरपंचायतीच्या निवडणुकीत प्रथमच मनसेचा उमेदवार विजयी झाला आहे. मनसेच्या स्थापनेनंतर गुहागर तालुक्यातील 1 ग्रामपंचायतीमध्ये मनसेने निर्विवाद बहुमत मिळविले होते. तर काही ग्रामपंचायतींमध्ये मनसेचे उमेदवार निवडून आले होते. मात्र 2009 नंतर कधीही मनसे निवडणुकीच्या रिंगणात उतरली नव्हती. गुहागर शहरात मनसेचे कार्यकर्ते काम करत होते. मात्र त्यांनाही निवडणूक लढण्याची संधी मिळाली नव्हती. गुहागर नगरपंचायतीची निवडणूक जाहीर झाल्यावर महाराष्ट्रातील मनसे शिवसेनेच्या युतीचा शुभारंभ आमदार भास्कर जाधव यांनी केला. गुहागर नगरपंचायतीमध्ये 2 जागा मनसेला देऊ केल्या. दुर्दैवाने मनसेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी आपल्या दोन उमेदवारांना पक्षाचा एबी फॉर्म दिला नाही. त्यामुळे या दोन उमेदवारांना अपक्ष म्हणून निवडणुक लढवावी लागली. तरीही प्रमोद गांधी यांच्या नेतृत्वात मनसेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार प्रचार केला. त्याचे फलित त्यांना प्रभाग 4 मधुन कोमल जांगळी यांच्या विजयाने मिळाले आहे.

BJP-ShivSena won Guhagar Nagar Panchayat
BJP-ShivSena won Guhagar Nagar Panchayat

पहिल्यांदाच भाजपचा नगराध्यक्ष

गुहागर नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये भाजपलाच नगराध्यक्ष पद मिळाले पाहीजे असा पराकोटीचा आग्रह भाजप कार्यकर्त्यांनी धरला होता. मात्र उमेदवारी अर्ज भरुन झाले तरी प्रदेश भाजपकडून गुहागरच्या नगराध्यक्ष पदासाठी हिरवा कंदिल मिळत नव्हता. त्यामुळे येथील भाजप कार्यकर्ते निराश झाले होते. 2024 च्या विधानसभा निवडणुकांपूर्वी देखील गुहागरची जागा भाजपलाच मिळणार याची ग्वाही भाजपचे नेते देत होते. मात्र जागावाटपात ही जागा शिवसेनेला दिली गेली. त्यामुळे भाजपमध्ये नाराजी होती. आता पुन्हा प्रदेश भाजपकडून असे झाले तर वेगळा विचार करावा लागेल अशी तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांची मानसिकता झाली होती. Noteworthy contests from Guhagar election
मात्र अखेरच्या क्षणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी गुहागरचा नगराध्यक्ष भाजपचाच असेल असे मुंबईच्या बैठकीत जाहीर केले. त्यामुळे भाजपमध्ये उत्साह संचारला. आता युतीचा निर्णय पालकमंत्र्यांनी जाहीर करणे अपेक्षित होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी सकाळी शिवसेना नेते शशिकांत शिंदे युतीचा फतवा घेऊन आले, जागा वाटप निश्चित झाले. शिवसेना व भाजपचे मनोमिलन झाल्यावर सर्व कार्यकर्ते झपाटून कामाला लागले. त्याचा परिणाम म्हणून आज प्रथमच भाजपच्या उमेदवार सौ. निता मालप यांनी निर्विवाद बहुमत मिळवत नगराध्यक्ष पदाची निवडणूक जिंकली आहे. Noteworthy contests from Guhagar election

Tags: ElectionGuhagarGuhagar Nagarpanchayat ElectionGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarNoteworthy contests from Guhagar electionगुहागर नगरपंचायत निकालगुहागर निकालटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालक्षवेधी लढतीलोकल न्युज
Share205SendTweet128
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.