उद्या निकाल : तिन फेऱ्यांत होणार मतमोजणी, दुपारी 11.30 पर्यंत चित्र स्पष्ट होणार
गुहागर, 20 : Guhagar NP Counting गुहागर नगर पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी 21 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजल्या पासून रंगमंदिर इथे होणार आहे. 2 डिसेंबरला गुहागर नगरपंचायतीसाठी मतदान झाले. 3 डिसेंबरला मतमोजणी होणार होती. मात्र कोर्टाच्या निर्णयामुळे राज्यातील काही नगरपरिषद, नगरपालीका व नगरपंचायतींमध्ये आज मतदान झाले. त्यामुळे महाराष्ट्रात झालेल्या सर्व नगरपंचायत, नगरपालीका, नगरपरिषांमधील मतमोजणी होणार आहे. Guhagar NP Counting अवघ्या दिड तासात, तिन फेऱ्यांमध्ये, 2 डिसेंबरला 4 हजार 486 मतदारांनी दिलेल्या मतांचा कौल कोणाला मिळणार याचे चित्र स्पष्ट होणार आहे. नगराध्यक्ष पदासाठी 4 उमेदवार रिंगणात आहेत. तर 17 नगरसेवकांसाठी 40 उमेदवार रिंगणात आहेत. Guhagar NP Counting
Guhagar NP Counting
मतमोजणीची माहिती देताना निवडणूक निर्णय अधिकारी म्हणाले की, सर्व मतमोजणी रंगमंदिर गुहागर येथे सकाळी 10.00 वा. सुरू होणार आहे. रंगमंदिर समोरील मैदानात पत्रकार, उमेदवार प्रतिनिधी यांच्यासाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात आला आहे. पक्ष कार्यकर्ते, नागरिक यांना मतमोजणी केंद्रापासून 200 मीटरच्या आत येता येणार नाही. 200 मिटरच्या बाहेर थांबलेल्या कार्यकर्त्यांना, नागरिकांना मतमोजणीची माहिती मिळण्यासाठी 4 कर्णे लावण्यात आले आहेत.
रंगमंदिरमध्ये मतमोजणीसाठी 6 टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रभाग क्र. 1 ते 6 ची इव्हिएम मशिन पहिल्या फेरीला घेतली जातील. त्यानंतर दुसऱ्या फेरीत प्रभाग क्र. 7 ते 12 आणि तिसऱ्या फेरीत प्रभाग क्र. 13 ते 17 अशी मतमोजणी होईल. एकाच वेळी त्या प्रभागातील मतमोजणीबरोबर नगराध्यक्ष पदासाठीच्या मतांची देखील मोजणी होईल. त्यामुळे प्रभागनिहाय नगरसेवक पदाच्या निकालासोबतच त्या प्रभागात नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला किती मते मिळाली ते देखील त्याचवेळी समजेल. सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरवात होईल. साधारणपणे 11.30 पर्यंत सर्व मतमोजणी संपेल असा अंदाज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. Guhagar NP Counting
कोणाला मिळणार जनतेचा कौल
नगराध्यक्ष पदाची निवडणूक
एकूण मतदार : 2856 पुरूष + 3105 महिला = 5961
झालेले मतदान : 2244 पुरूष + 2242 महिला = 4486
टक्केवारी : 75.26 टक्के
उमेदवार
कांबळे पारिजात पराग (Shivsena UBT)
बागकर सुजाता श्रीधर (NCP)
मालप निता विकास (BJP Shivsena Yuti)
वाघधरे सुप्रिया सुरेश (Independent)
प्रभाग १
एकूण मतदार : 264 पुरूष + 259 महिला = 523
झालेले मतदान : 192 पुरूष + 195 महिला = 387
टक्केवारी : 74 टक्के
उमेदवार
कनगुटकर दिपक अमरनाथ (शिवसेना भाजप युती)
बागकर समीर यशवंत (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे)
शिरधनकर दिपक ताराचंद्र (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी)
प्रभाग 2
एकूण मतदार : 193 पुरूष + 210 महिला = 403
झालेले मतदान : 157 पुरूष + 163 महिला = 320
टक्केवारी : 79.40 टक्के
उमेदवार
भोसले उमेश अनंत (भाजप शिवसेना युती)
शेटे सतिश वासुदेव (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे)
प्रभाग 3
एकूण मतदार : 188 पुरूष + 194 महिला = 382
झालेले मतदान : 156 पुरूष + 135 महिला = 291
टक्केवारी : 76.18 टक्के
उमेदवार
घोरपडे रिध्दी राजेश (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे)
तेलगडे स्वरा गणेश (शिवसेना भाजप युती)
प्रभाग 4
एकूण मतदार : 174 पुरूष + 199 महिला = 373
झालेले मतदान : 147 पुरूष + 156 महिला = 303
टक्केवारी : 81.23 टक्के
उमेदवार
जांगळी कोमल दर्शन (अपक्ष – मनसे) (MNS)
जांगळी स्मिता दशरथ (भाजप शिवसेना युती)
सांगळे नेहा नितीन (अपक्ष)
प्रभाग 5
एकूण मतदार : 152 पुरूष + 157 महिला = 309
झालेले मतदान : 112 पुरूष + 111 महिला = 223
टक्केवारी : 72.17 टक्के
( हे मतदान नगराध्यक्ष पदाच्या निवडीकरीता झाले. या प्रभागातील भाजप शिवसेना युतीच्या उमेदवार बिनविरोध निवडून आल्या आहेत.)
बिनविरोध विजयी : मावळंकर वैशाली संतोष (भाजप शिवसेना युती)
प्रभाग 6
एकूण मतदार : 150 पुरूष + 151 महिला = 301
झालेले मतदान : 111 पुरूष + 90 महिला = 201
टक्केवारी : 66.78 टक्के
उमेदवार
भावे अनुषा शार्दुल (भाजप शिवसेना युती)
रहाटे रिध्दी प्रविण (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे)
प्रभाग 7
एकूण मतदार : 149 पुरूष + 152 महिला = 301
झालेले मतदान : 100 पुरूष + 104 महिला = 204
टक्केवारी : 67.77 टक्के
उमेदवार
दणदणे विदिशा धनंजय (शिवसेना भाजप युती)
वराडकर प्रगती सुनील (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे)
प्रभाग 8
एकूण मतदार : 164 पुरूष + 138 महिला = 302
झालेले मतदान : 128 पुरूष + 103 महिला = 231
टक्केवारी : 76.49 टक्के
उमेदवार
गुहागरकर रिया संतोष (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे)
रहाटे सुषमा सुधाकर (भाजप शिवसेना युती)
प्रभाग 9
एकूण मतदार : 192 पुरूष + 223 महिला = 415
झालेले मतदान : 157 पुरूष + 168 महिला = 325
टक्केवारी : 78.31 टक्के
उमेदवार
कदम शितल नरेश (NCP)
घाडे मिरा विकास (BJP Shivsena Yuti)
मालप वैशाली पराग (UBT Shivsena)
प्रभाग 10
एकूण मतदार : 139 पुरूष + 171 महिला = 310
झालेले मतदान : 106 पुरूष + 115 महिला = 221
टक्केवारी : 71.29 टक्के
उमेदवार
आरेकर राजेंद्र सिताराम (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे)
बेंडल प्रदिप गोविंद (शिवसेना भाजप युती)
प्रभाग 11
एकूण मतदार : 171 पुरूष + 186 महिला = 357
झालेले मतदान : 108 पुरूष + 123 महिला = 231
टक्केवारी : 64.71 टक्के
उमेदवार
प्रविण प्रकाश रहाटे (UBT Shivsena)
साटले सुचित सुधाकर (शिवसेना भाजप युती)
प्रभाग 12
एकूण मतदार : 135 पुरूष + 122 महिला = 257
झालेले मतदान : 109 पुरूष + 88 महिला = 197
टक्केवारी : 76.65 टक्के
उमेदवार
गुरव निता सतीष (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे)
मांडवकर अन्विता अभिजीत (NCP)
सोमण विशाखा विश्र्वास (भाजप शिवसेना युती)
प्रभाग 13
एकूण मतदार : 123 पुरूष + 175 महिला = 298
झालेले मतदान : 91 पुरूष + 114 महिला = 205
टक्केवारी : 68.79 टक्के
उमेदवार
भागडे राजेंद्र अर्जुन (शिवसेना भाजप युती)
होळंब सुजल विष्णू (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे)
प्रभाग 14
एकूण मतदार : 151 पुरूष + 205 महिला = 356
झालेले मतदान : 120 पुरूष + 134 महिला = 254
टक्केवारी : 71.35 टक्के
उमेदवार
भागडे सौरभ राजेंद्र (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी)
मालप संजय बाळाराम (भाजप शिवसेना युती) (BJP Shivsena Yuti)
वराडकर संगिता संजय (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे)
प्रभाग 15
एकूण मतदार : 149 पुरूष + 182 महिला = 331
झालेले मतदान : 120 पुरूष + 119 महिला = 239
टक्केवारी : 72.21 टक्के
उमेदवार
उदेक संदेश सुरेश (शिवसेना भाजप युती)
जाधव अनिकेत प्रकाश (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे)
प्रभाग 16
एकूण मतदार : 200 पुरूष + 211 महिला = 411
झालेले मतदान : 183 पुरूष + 178 महिला = 361
टक्केवारी : 87.83 टक्के
उमेदवार
गोयथळे अमोल प्रताप (शिवसेना भाजप युती)
गोयथळे मनिष भरत (अपक्ष)
विखारे राज रविंद्र (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे)
प्रभाग 17
एकूण मतदार : 162 पुरूष + 170 महिला = 332
झालेले मतदान : 147 पुरूष + 146 महिला = 293
टक्केवारी : 88.25 टक्के
उमेदवार
आरेकर समिक्षा रघुनंदन (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी)
आरेकर सिध्दी समीर (शिवसेना)
मोरे श्रीया सागर (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे)
