गुहागर, ता. 20 : तालुक्यातील तळवळी येथील कुणबी महीला मंडळ सहचिटणीस सौ. अनुष्का अजय आग्रे यांनी मार्गशीर्ष महिन्यातील श्री महालक्ष्मी गुरुवार व्रताचे उद्यापनाला गुहागर शाखेच्या “प्रभात दिनदर्शिका २०२६” चे महिलांना वान देऊन आदर्श निर्माण केला. Distribution of calendars on the occasion of Mahalaxmi Vrat
मार्गशीर्ष महिन्यात देवी श्री महालक्ष्मीचे गुरुवारी व्रत करण्याची प्रथा आहे. अनेक सुवासिनी महिला किंवा कुमारी का हे व्रत करतात. शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापन केले जाते. धन, समॄद्धी, सुख सौभाग्य मिळविण्यासाठी हे व्रत करतात. हा महिना महालक्ष्मी आणि भगवान विष्णू यांना समर्पित आहे. तसेच मार्गशीर्ष महिन्यात वान देणे ही खुप महत्वाचे मानले जाते. Distribution of calendars on the occasion of Mahalaxmi Vrat
