तहसीलदारांसह सर्कल अधिकारी यांनी पकडले वाहन
गुहागर, ता. 20 : पर्यटनाचे केंद्रबिंदू ठरलेल्या गुहागर समुद्रकिनाऱ्यावर खुलेआम अवैध वाळू उपसा करून वाहतूक करणाऱ्या वाहनावर गुहागर तहसीलदारांनी कारवाई करत यावर चाप बसवला आहे. मध्यरात्री वाहन पकडून तातडीने पंचनामा करून कारवाई केल्याने अवैद्य उपसा करणाऱ्या सर्वांचे धाबे दणाणले आहेत. Tehsildar takes action against sand minin
गुहागर समुद्रकिनाऱ्यावर खुलेआम अवैद्य वाळू उपसा करून चढ्या दराने वाळू विक्री केली जात होती. समुद्रकिनाऱ्याचे रक्षण करणारेच कुंपणच शेत खातय अशी अवस्था गुहागर समुद्रकिनाऱ्याची झाली होती. अशा स्थितीत नगरपंचायतीच्या निवडणुकीचा लाभ घेत मोठ्या प्रमाणावर उपसा व वाहतूक सुरू होती. येथील सर्कल अधिकारी व तलाठी व तहसीलदार परीक्षित पाटील यांनी या अवैध व्यवसाय विरोधात कठोर धोरण अवलंबिले. दोन दिवसांपूर्वी रात्री या अवैध व्यवसायावर स्वतः तहसीलदार यांनी लक्ष ठेवले होते. वाळू उपसा करून जवळच्या मार्गाने जात असताना अर्धा ब्रास वाळू वाहतूक करणारे वाहन रात्री साडेअकरा वाजता पकडले. वाहन पकडताच काहींनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला मात्र याला न जुमानता तहसीलदार परीक्षित पाटील यांनी थेट कारवाई केली आहे. Tehsildar takes action against sand minin

याबाबत पुष्कर पावस्कर यांना 25 हजार रुपये दंड भरण्याची नोटीस बजावली आहे. पकडलेल्या वाहनाचे कोणतेही कागदपत्र नाहीत, अशा मध्येच सदर वाहनावर आरटीओ विभागाच्या कारवाई बरोबर बंदपत्र करून प्रांताधिकारी कार्यालयात पुढील मोठ्या दंडासाठी प्रस्ताव केला जाणार आहे. अजूनही नोटीस बजावल्याप्रमाणे संबंधित अवैद्य वाहतूक करणाऱ्या व्यक्तीने कोणताही दंड भरलेला नाही. परिणामी यावर कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे. गुहागर समुद्रकिनाऱ्यावर अवैध वाळू उपसा व व्यवसाय वाढला होता. जणू किनाऱ्याचे मालक आम्हीच असेच काहींचे वागणे होते. आमचं कोणीही वाकड करू शकत नाही. अशा अविर्भावात असलेल्यांवर चांगली दहशत या कारवाईमुळे निर्माण झाली आहे. आता यावर स्थानिक सर्कल अधिकारी व तलाठी किती लक्ष ठेवतात हे पहावे लागणार आहे. Tehsildar takes action against sand minin
