गुहागर मधील विद्यार्थ्यांकरिता सुवर्ण संधी
गुहागर, ता. 19 : ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ खेड, (रत्नागिरी) या शैक्षणिक संस्थेमार्फत इ. 10 वीत शिक्षण घेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांकरिता गुरुवार दि. 25 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10. 30 वा. ग्रामपंचायत हॉल, पाटपन्हाळे येथे ज्ञानदीप स्कॉलरशीप टेस्टचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये इ.10 वी च्या अभ्यासक्रमावर आधारित Science, Maths व English या विषयावर दीड तासांची टेस्ट घेतली जाईल. Scholarship Test organized by Gyandeep Bhadgaon
या टेस्टमध्ये जे विद्यार्थी यश मिळवतील व जे विद्यार्थी ज्ञानदीपला प्रवेशित होतील त्या विद्यार्थ्यांना घवघवीत शिष्यवृत्ती दिली जाईल. या स्कॉलरशीप टेस्टमुळे ज्ञानदीपने विद्यार्थ्यांना एक सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली आहे. तरी गुहागर व आजूबाजूच्या सर्व परिसरातील इ. 10 वी च्या सर्व विद्यार्थ्यांनी सदर स्कॉलरशीप टेस्टचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष मा. अरविंद तोडकरी यांनी केले आहे. Scholarship Test organized by Gyandeep Bhadgaon