रत्नागिरी, ता. 18 : भारत शिक्षण मंडळाच्या देव, घैसास, कीर कला, वाणिज्य आणि विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयामध्ये आंतरमहाविद्यालयीन हँडबॉल स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत महाविद्यालयाने तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. Handball competition in Dev, Ghaisas, Kier College

या स्पर्धेचे उद्घाटन भारत शिक्षण मंडळ संस्थेचे कार्यवाह धनेश रायकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी शुभेच्छापर मनोगतातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. स्पर्धेमध्ये गोगटे- जोगळेकर महाविद्यालयाचा संघ विजयी ठरला तर उपविजेतेपद एस. पी. के. कॉलेज सावंतवाडी यांनी मिळवले. या वेळी मुंबई विद्यापीठाचे कोकण विभाग समन्वयक शशांक उपशेट्ये, कार्याध्यक्ष श्रीराम भावे, उपकार्याध्यक्ष डॉ. चंद्रशेखर केळकर, विश्वस्त विनायक हातखंबकर आणि संस्था सदस्य, महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्य मधुरा पाटील, उपप्राचार्य वसुंधरा जाधव, क्रीडा विभाग प्रमुख वैभव घाणेकर आणि विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. वैभव कीर यांनी केले. Handball competition in Dev, Ghaisas, Kier College
