संतप्त वरवेली ग्रामस्थांची पोलीसांत तक्रार
गुहागर, ता. 16 : Baby dies after delivery येथील ग्रामीण रुग्णालयात प्रसुतीसाठी आलेल्या महिलेचे प्रसुतीनंतर बाळ दगावल्याचा प्रकार काल मंगळवारी घडला. याबाबत नातेवाईकांनी गुहागर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तसेच डॉक्टरांचे निष्काळजीपणामुळे नवजात बालकास जीव गमवावा लागल्याची तक्रार जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे केली आहे.
Baby dies after delivery
तालुक्यातील वरवेली येथील शिंदे आडनावनामक महिला प्रसुतीसाठी गुहागर ग्रामीण रुग्णालयात काल मंगळवारी पहाटे 5 वाजता दाखल झाली होती. सकाळी 8 वाजेपर्यंत या महिलेची प्रसुती झाली नव्हती. त्यामुळे तिच्या नातेवाईकांनी तिला प्रसुतीसाठी इतर रुग्णालयांमध्ये नेण्याचे ठरविले. मात्र ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी राहुल हजारे यांनी व्यवस्थित प्रसुती होईल असे सांगत त्यांना अन्यत्र रुग्णालयात जाण्यापासून थांबवले. मंगळवारी दुपारी 12 वाजताच्या दरम्यान, या महिलेची प्रसुती झाली मात्र, लगेचच बाळ दगावले. यामुळे खळबळ उडाली. प्रसुत महिलेच्या वरवेली गावातील अनेक ग्रामस्थ त्यांना समजताच रुग्णालयात दाखल झाले. त्यांनी तेथे डाँक्टरला जाब विचारला. तुम्ही एवढे तास महिला रुग्णाला का ताटकळत ठेवलेत असा जाब विचारुन तुमच्या हलगर्जीपणामुळेच बाळ दगावल्याचा आरोप केला. या संदर्भात संबंधित महिलेल्या नातेवाईकांनी गुहागर पोलीस ठाण्यासह जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे. Baby dies after delivery