गुहागर शहरचे ध्वनीघोषणाद्वारे सुचना व जनजागृती करण्याबाबत
गुहागर, ता. 12 : गुहागर नगरपंचायत कार्यक्षेत्रात नागरिकांना करण्यात येणार्या सुचना, विविध योजना यांची जनजागृती ही सोशल मेडियावरती होत असते तसेच ती ध्वनी-घोषणा घंटागाडीच्या माध्यमातून करावी. नगरपंचायत अंतर्गत पाणीपुरवठा योजनेत उदा. तांत्रिक बिघाड, दुरुस्तीचे काम, पाणीपुरवठा विभागातील समस्या यामुळे पाणीपुरवठा खंडित होण्याची शक्यता असल्यास कधी पासुन कधीपर्यंत तसेच कचरा गाडी येणार नसल्यास एक दिवस आधी येणार नसल्याची सुचना देण्यात यावी. पाणीपुरवठा खंडित होण्याच्या कालावधीत नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे, नागरिकांना वेळेवर माहिती मिळावी आणि गैरसमज टाळता यावेत यासाठी आपण ध्वनी-घोषणा घंटागाडीद्वारे संपूर्ण नगरपंचायत कार्यक्षेत्रात ही सूचना प्रसारित करावी. MNS’s statement to Guhagar Nagar Panchayat

सुचना सोशल मिडीयावरती फक्त प्रसारित होत आहेत पण सर्व नागरिक विशेष म्हणजे महिला वर्ग, जेष्ठ नागरिक हे या सोशल मिडीयावरती जास्त प्रमाणात सहभागी नाहीत त्यामुळे सर्व नागरिकांपर्यंत या सुचना पोहचत नाहीत. यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर शहरचे गुहागर नगरपंचायतला ध्वनीघोषणा करुन सुचना व जनजागृती करण्याचे निवेदन मनसे संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी, तालुकाध्यक्ष सुनिल हळदणकर यांच्या मार्गदर्शनाखाली उप शहराध्यक्ष विक्रांत सांगळे यांच्या हस्ते श्री.मोरे यांना देण्यात आले. MNS’s statement to Guhagar Nagar Panchayat
यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर शहराध्यक्ष अभिजित रायकर, तालुका सचिव प्रशांत साटले, मनविसे तालुकाध्यक्ष प्रथमेश रायकर, विभाग अध्यक्ष दर्शन जांगळी, आकाश जांगळी, निशांत सांगळे तसेच महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते. MNS’s statement to Guhagar Nagar Panchayat
