• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
21 December 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

रत्नागिरीत १५ ते १८ जानेवारीला सागर महोत्सव

by Guhagar News
December 12, 2025
in Ratnagiri
76 1
1
Sagar Festival in Ratnagiri
150
SHARES
429
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

रत्नागिरी, ता. 12 :  रत्नागिरीत आसमंत बेनेव्होलन्स फाउंडेशनतर्फे १५ ते १८ जानेवारी २०२६ दरम्यान सागर महोत्सव या समुद्र, पर्यावरण आणि जबाबदार पर्यटनविषयक चार दिवसीय महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सागरी जैवविविधतेचा अभ्यास, तज्ज्ञांची व्याख्याने, निसर्गभ्रमंती आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून समुद्राबद्दल जागरूकता व सहभाग वाढवणे हा महोत्सवाचा मुख्य हेतू आहे, अशी माहिती आसमंत फाउंडेशनचे संस्थापक नंदकुमार पटवर्धन व संचालक जगदीश खेर यांनी दिली. Sagar Festival in Ratnagiri

महोत्सवाचा सविस्तर तपशील

१५ जानेवारी २०२६ : अभ्यासफेऱ्यांद्वारे महोत्सवाची सुरुवात होणार आहे. पहिल्या दिवशी सकाळी लवकर खारफुटी जंगलाची अभ्यास फेऱ्यांचे आयोजन केले असून तज्ज्ञ हेमंत कारखानीस व शांभवी चव्हाण यांच्यासोबत सहभागी खारफुटी व किनारी परिसंस्थेचा अभ्यास करतील. कर्ला जेटी येथून दोन बोटींद्वारे फेऱ्या आयोजित करण्यात आल्या आहेत. सर्वसाधारण एका फेरील ९० मिनिटे एवढा कालावधी लागतो. प्रथम आलेल्याला प्रथम प्राधान्य या तत्त्वावर होणार आहे. सायंकाळी खडकाळ किनारा अभ्यास फेरीचे आयोजन असून प्रदीप पाताडे व डॉ. अमृता भावे यांच्या मार्गदर्शनाखाली भाटकरवाडा परिसरातील शैवाळ, खडकाळ किनारा आदींचा अभ्यास होणार आहे. Sagar Festival in Ratnagiri

सकाळी ९ वाजता मुख्य अतिथी म्हणून डॉ. शैलेश नायक यांच्या उपस्थितीत होणार आहे. मान्यवरांमध्ये रत्नागिरी जिल्हाधिकारी, राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्थेचे संचालक, पर्यटन विभागाचे सचिव, मत्स्य महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता यांचा समावेश असेल. उद्घाटनाच्या दिवशी विविध तज्ज्ञांची मार्गदर्शनपर व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत. Sagar Festival in Ratnagiri

डॉ. बबन इंगोले, राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेचे निवृत्त मुख्य वैज्ञानिक – समुद्री खनिजसंपत्ती आणि जैवविविधतेवरील परिणाम. डॉ. दीपक आपटे, प्रसिद्ध सागरी पर्यावरणशास्त्र आणि संवर्धनतज्ज्ञ- यांची मुलाखत (संवाद : डॉ. अमृता भावे). जबाबदार पर्यटनावरील लघुपट व स्ट्रीट प्ले – फर्ग्युसन महाविद्यालय आणि गोगटे-जोगळेकर महाविद्यालय. डॉ. संतोष शिंत्रे- यांचे पर्यावरण संप्रेषण या विषयावर व्याख्यान होईल. डॉ. ईशा बोपर्डीकर – सागरी सस्तन प्राणी या विषयावर सादरीकरण करतील. १७ जानेवारी २०२६ : सकाळी भाट्ये समुद्रकिनारी पुळणी किनारा अभ्यास फेरी आयोजित केली असून तज्ज्ञांच्या सहभागाने उपस्थितांना मार्गदर्शन होईल. डॉ. नरसिंह ठाकूर (NIO) – राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेचे मुख्य वैज्ञानिक सागरी संशोधन ते उद्योगविश्व या विषयावर मार्गदर्शन करतील. समीर डामरे (NIO) राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेतील ज्येष्ठ शास्त्रज्ञ महासागरातील निर्जीव संसाधने या विषयावर सादरीकरण करतील. जबाबदार पर्यटनावरील लघुपट. डॉ. शेखर मांडे – वरिष्ठ शास्त्रज्ञ तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे माजी सचिव यांचे हवामान बदल आणि जनसहभागाची भूमिका या विषयावर व्याख्यान होईल. भाटकरवाडा येथे खडकाळ किनारा अभ्यास फेरी होणार आहे. मार्गदर्शक डॉ. अमृता भावे आणि प्रदीप पताडे. १८ जानेवारी २०२६ : दिवसाची सुरुवात पुन्हा भाट्ये येथील पुळणी किनारा अभ्यास फेरीने होईल. डॉ. संजय देशमुख (ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि माजी कुलगुरू, मुंबई विद्यापीठ) – The Ocean Within Us : आपल्या आतला महासागर – स्वप्नातला, सर्व जीवनाला आधार देणाऱ्या अनंत निळ्या रंगाचा शोध घ्या आणि त्याचे रक्षण करा या विषयावर सादरीकरण. शमा पवार (उपसंचालक, पर्यटन विभाग, महाराष्ट्र) – Responsible Tourism जबाबदार पर्यटन या विषयावर व्याख्यान. भोजन अवकाशानंतर दुपारी ‘संगीत कुर्माख्यान’ – मॅंग्रोव्ह फाउंडेशनचे लोकनाट्य सादर केले जाईल. यानंतर समुद्रकिल्ल्यांच्या वन्यजीव सर्वेक्षणाचा अनुभव, सहभागींना बक्षीस वितरण, तसेच महोत्सवाचा अधिकृत समारोप करण्यात येईल. Sagar Festival in Ratnagiri

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarSagar Festival in Ratnagiriटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share60SendTweet38
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.