• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
21 December 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

महर्षी परशुराम कॉलेजचे IIC रीजनल मीट २०२५ मध्ये यश

by Guhagar News
December 9, 2025
in Guhagar
53 1
1
Velaneshwar College's success in IIC Regional Meet 2025
104
SHARES
298
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 09:  विद्याप्रसारक मंडळाच्या महर्षी परशुराम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, वेळेश्वर (एमपीसीओई) यांनी आयआयसी रीजनल मीट २०२५ मध्ये उल्लेखनीय यश संपादन करत राज्यातील अव्वल महाविद्यालयांच्या यादीत ठळक स्थान मिळवले आहे. महाराष्ट्रातील सुमारे ५० प्रतिष्ठित अभियांत्रिकी आणि विज्ञान महाविद्यालयांमधून स्पर्धा करून बेस्ट ५ पोस्टर्समध्ये स्थान मिळवणे ही एमपीसीओईसाठी महत्त्वपूर्ण आणि अभिमानाची कामगिरी मानली जात आहे. Velaneshwar College’s success in IIC Regional Meet 2025

आयआयसी (Institution’s Innovation Council) आयोजित या रीजनल मीटमध्ये विविध महाविद्यालयांनी नवोपक्रम, सर्जनशीलता, स्टार्टअप संस्कृती आणि नाविन्यपूर्ण प्रकल्प सादरीकरणाच्या आधारे सहभाग नोंदवला होता. पोस्टर सादरीकरण या स्पर्धेतील अत्यंत महत्त्वाचा घटक मानला जातो. नवकल्पना, डिझाइनची गुणवत्ता, विषयातील संशोधनाची खोली आणि सादरीकरणातील स्पष्टता या निकषांवर निवड करण्यात आली. या वर्षीच्या टॉप ५ पोस्टर्समध्ये स्थान मिळवणारी महाविद्यालये १) विद्याप्रसारक मंडळाचे महर्षी परशुराम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, वेळेश्वर, रत्नागिरी २) आयआयटी बॉम्बे ३) एफआर. कॉन्सेइकाओ रॉड्रिग्ज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, बांद्रा ४) एसआयईएस कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स, सायन ५) भारती विद्यापीठ भवनस सरदार पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ही आहेत. Velaneshwar College’s success in IIC Regional Meet 2025

या यशासंदर्भात महाविद्यालयात अत्यंत आनंद व्यक्त करण्यात आला. आयआयसीचे अध्यक्ष श्री. सतीश घोरपाडे आणि उपाध्यक्ष सौ. गौरी जोशी यांनी गेल्या काही महिन्यांपासून विद्यार्थी आणि शिक्षकांना समन्वयित करत आयआयसी उपक्रम प्रभावीपणे राबवले आहेत. आयआयसीच्या सर्व सदस्यांनी नवोन्मेषी प्रकल्प, कल्पना आणि उपक्रमांना दिशा देण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न केले. त्यांच्या एकत्रित परिश्रमांचेच हे फळ असल्याचे प्राचार्यांसह शिक्षकवर्गाने नमूद केले. Velaneshwar College’s success in IIC Regional Meet 2025

स्पर्धेसाठी सादर केलेले पोस्टर हे केवळ डिझाइनपुरते मर्यादित न राहत विविध संकल्पना, उद्दिष्टे आणि प्रकल्पाचे दृष्टीकोन स्पष्टपणे दर्शवणारे होते. या पोस्टरच्या नाविन्यपूर्ण मांडणी आणि आकर्षक डिझाइनसाठी श्री. संजीव राहटे यांचे विशेष कौतुक करण्यात आले. त्यांचे तांत्रिक कौशल्य, रंगसंगतीची जाण आणि विषय सादरीकरणाची शैली या पोस्टरला विशेष ठरवणाऱ्या ठरल्या. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश पवार यांनी आयआयसी टीमचे अभिनंदन करत विद्यार्थ्यांमध्ये नवोपक्रम, संशोधनवृत्ती आणि प्रत्यक्ष कार्यशैली विकसित करण्यासाठी अशा उपक्रमांना महाविद्यालय कायम प्रोत्साहन देत राहील असे सांगितले. तसेच ग्रामीण किनारी भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार तांत्रिक शिक्षण देण्याच्या महाविद्यालयाच्या उद्दिष्टाला हे यश बळकटी देणारे असल्याचेही त्यांनी नमूद केले. Velaneshwar College’s success in IIC Regional Meet 2025

या स्पर्धेत मिळालेल्या यशामुळे महर्षी परशुराम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग हे केवळ जिल्ह्यातच नव्हे तर राज्यातील अग्रगण्य संस्थांपैकी एक म्हणून पुन्हा अधोरेखित झाले आहे. संस्थेच्या कौशल्यविकासपर उपक्रमांना, विद्यार्थी-केंद्रित धोरणांना आणि नाविन्यपूर्ण संस्कृतीला मिळालेल्या या यशामुळे विद्यार्थी आणि शिक्षक वर्गात उत्साह व अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. आयआयसी रीजनल मीट २०२५ मधील हा मानाचा सन्मान महाविद्यालयाच्या सर्वांगीण प्रगतीतील आणखी एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. Velaneshwar College’s success in IIC Regional Meet 2025

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarVelaneshwar College's success in IIC Regional Meet 2025टॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share42SendTweet26
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.