गुहागर, ता. 08 : तालुक्यातील पालपेणे जनसेवा एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल येथे माजी विद्यार्थी व स्कूल यांच्या सहकार्यातून साकारण्यात आलेल्या गुरुदक्षिणा सभागृहाचा संस्थार्पण कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनसेवा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विष्णू पालकर होते. गुरुदक्षिणा सभागृहाचे उद्घाटन विद्यालयाचे मुख्याध्यापक पांडुरंग हासबे, संस्था कार्यालयाचे उद्घाटन संस्थेचे माजी सचिव भिकाजी पडवेकर तर एमएससी आयटी प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन संस्थेचे माजी अध्यक्ष गणपत खैर यांच्या हस्ते करण्यात आले. “Gurudakshina Hall” inaugurated at Palpene

यावेळी माजी विद्यार्थी उपस्थित होते. संस्थेचे माजी अध्यक्ष गणपत खैर, सचिव नथुराम हरचिलकर, माजी सदस्य रमेश खैर, संस्थेचे अध्यक्ष व माजी विद्यार्थी कमिटीचे अध्यक्ष अरविंद पालकर, सचिव निलेश टाणकर, खजिनदार शैलेश खैर, वैभव पडवेकर, संदीप पडवेकर, कृष्णा पालकर, वसंत मांडवकर, भालचंद्र मांडवकर, तुकाराम मांडवकर, माजी मुख्याध्यापक पाटील सर, माजी शिक्षक घोरपडे सर उपस्थित होते. माजी विद्यार्थ्यांनी गुरुदक्षिणा सभागृहास सहकार्य केल्याबद्दल त्यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. “Gurudakshina Hall” inaugurated at Palpene
