निवडणूक आयोगाचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश
मुंबई, ता. 04 : उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील २६४ नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी झालेल्या मतदानाची येत्या २१ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. तोवर मतदानयंत्रे ठेवलेल्या ठिकाणी सशस्त्र पोलीस बंदोबस्त ठेवावा, गोदामांच्या व्यवस्थापनासाठी स्वतंत्र अधिकारी नियुक्त करावा, सीसी टीव्ही बसवावेत असे आदेश राज्य निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. Election Commission orders

राज्यातील २४६ नगरपालिका- ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकीची घोषणा करताना राज्य निवडणूक आयोगाने या सर्व ठिकाणी ३ डिसेंबरला मतमोजणी होईल, अशी घोषणा केली होती. काही नगरपालिकां मधील उमेदवारी अर्ज छाननीचा वाद न्यायालयात गेल्यामुळे आयोगाने शनिवारी एका आदेशान्वये न्यायप्रविष्ठ प्रकरणातील २४ नगरपालिका व नगरपंचायती आणि १५४ सदस्यांची निवडणूक स्थगित केली होती. ही निवडणूक आता २० डिसेंबरला घेण्याचे आदेश आयागाने दिल्यानंतर सर्व परिषदांची निवडणूक झाल्याशिवाय मतमोजणी होऊ नये, अशी मागणी करीत काही उमेदवारांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. Election Commission orders
त्यावर २४ नगरपालिका -नगरपंचायती आणि १५४ सदस्यांची निवडणूक झाल्याशिवाय मतमोजणी करु नका, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार आता सर्व नगरपालिका- नगरपंचायतींची २१ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. Election Commission orders
