रत्नागिरी, ता. 03 : सीए इन्स्टिट्यूटच्या रत्नागिरी शाखेतर्फे हॉटेल विवेक येथे चर्चासत्र घेण्यात आले. या वेळी पीएफ आणि ईएसआयसी तसेच नवीन कामगार कायदे, ऑडिटिंग स्टँडर्डस् आणि जीएसटी कायद्यातील नवीन महत्वाच्या तरतुदी या विषयावर वक्त्यांनी मार्गदर्शन केले. Seminar at CA Institute branch

दीपप्रज्वलन आणि सीए गीत सादर करून कार्यक्रमाला सुरवात झाली. प्रास्ताविकामध्ये करताना शाखेचे अध्यक्ष सीए मंदार जोशी यांनी वरील विषयांचे महत्त्व सांगितले. प्रथम सत्रात सीए अक्षय जोशी यांनी पीएफ आणि ईएसआयसी तसेच नवीन कामगार कायदे यावर प्रकाश टाकला. द्वितीय सत्रात सीए प्रसाद आचरेकर यांनी ऑडिटिंग स्टँडर्डस् आणि ऑडिट डॉक्युमेंटेशनचे महत्व याबद्दल मार्गदर्शन केले. तृतीय सत्रात अॅड. अभिजीत बेर्डे यांनी जीएसटी कायद्यातील नवीन महत्वाच्या तरतुदी याबद्दल मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन सीए कपिल लिमये यांनी केले. या चर्चासत्राला रत्नागिरीतील बहुतांश सीए उपस्थित होते. Seminar at CA Institute branch
