संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 03 : निर्मल ग्रामपंचायत झोंबडीच्या संयुक्त विद्यमाने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाअंतर्गत गुहागर तालुक्यातील झोंबडी काजळीवाडी येथे आरोग्य शिबिरात सर्व ग्रामस्थांना सरपंच अतुल लांजेकर यांच्या हस्ते हॅन्डवॉशचे वाटप करण्यात आले. यावेळी सरपंच लांजेकर यांनी ग्रामस्थांना आरोग्याबाबत घ्यावयाची काळजी आणि स्वच्छता अभियानाबाबत मौलिक मार्गदर्शन केले. Handwash distributed by Atul Lanjekar

यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र तळवलीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुप्रिम कुमार कांबळे, समुदाय आरोग्य अधिकारी राजेश मोहिते, आरोग्य निरीक्षक मदन जानवळकर, आरोग्य सेवक वैभव जाधव, विकास दुपटे, अजय हळये, विशाल चव्हाण, आरोग्य सेविका मोहिनी पानगले, अक्षता पाणकर, आशा सेविका मिनल घोणसे पाटील, पूजा कदम, उर्मिला बाईत, साक्षी सरदेसाई, उपकेंद्र मदतनीस ग्रीष्मा जाधव, वाडी अध्यक्ष सुरेश पालशेतकर, झोंबडी काजळीवाडी उत्कर्ष सेवा मंडळ अध्यक्ष नितीन आंबोवकर, सचिव राकेश शिरकर, उत्कर्ष सेवा महिला मंडळ अध्यक्ष सुषमा पालशेतकर, झोंबडी ग्रामपंचायत अधिकारी गोरखनाथ सोनवणे, ग्रामपंचायत अधिकारी दीपक गायकवाड, उपसरपंच प्रणाली पवार, सदस्य जैनब ममतुले, मयुरी लांजेकर, पाणीपुरवठा कनिष्ठ अभियंता शिरीष पापरकर आदी. उपस्थित होते. Handwash distributed by Atul Lanjekar
