महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य
गुहागर, ता. 02 : विद्या प्रसारक मंडळ संचालित महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. अविनाश पवार यांनी लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठातून आपला PhD पदवीप्राप्तीचा मान पटकावून संस्थेचा लौकीक अधिक उंचावला आहे. Dr. Avinash Pawar remarkable achievements

आपल्या संशोधनात त्यांनी हापूस आंब्याच्या पानांच्या परिस्तीवरून 10 प्रकारचे रोग ओळखणारे अत्याधुनिक Artificial Intelligence (AI) आधारित मॉडेल विकसित केले आहे. या मॉडेलमुळे शेतकऱ्यांना आंब्याच्या झाडांवरील रोग लवकर व अचूकपणे ओळखणे शक्य होणार असून, योग्य उपचाराची वेळीच अंमलबजावणी करून उत्पन्नात लक्षणीय वाढ साधता येईल, असे संशोधनात अधोरेखित झाले आहे. Dr. Avinash Pawar remarkable achievements
डॉ. पवार यांच्या या अभिनव संशोधनामुळे कृषीक्षेत्रासाठी नवे दालन खुले झाले असून, त्यांच्या यशाबद्दल विद्या प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. विजय बेडेकर तसेच पदाधिकाऱ्यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करत पुढील शैक्षणिक व संशोधन वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. Dr. Avinash Pawar remarkable achievements
