गुहागर, ता. 21 : Guhagar BJP wins in 5 No Ward उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी गुहागर नगरपंचायतीमधील वार्ड क्र. 5 मधील मनसेच्या उमेदवार सिध्दी राजेश शेटे यांनी आपली उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे भाजपच्या नगरसेविका सौ. वैशाली मावळंकर यांची निवडणूकच बिनविरोध झाली आहे. Guhagar BJP wins in 5 No Ward, गुहागर नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी 2 डिसेंबरला मतदान होणार आहे. सर्व मतदारांनी आपल्या मतदान करावे.
आमदार भास्कर जाधव यांनी गुहागर नगरपंचायतीच्या निवडणुकीत युती करण्याचा निर्णय घेतला. ठाकरे बंधु एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असताना महाराष्ट्रातील सेना मनसे युतीची मुहूर्तमेढ त्यांनी रोवली. गुहागर नगरपंचायतीमधील वार्ड क्र. 4 आणि 5 मधील जागा मनसेसाठी सोडल्या. या निर्णयाचे स्वागत झाले. गुहागरात मनसे पक्ष उभा करणारे कै. राजेश शेटे यांना मनसेने वार्ड क्र. 5 मधुन उमेदवारी दिली. तर कोमल दर्शन जांगळी यांना वार्ड क्र. 4 मधून उमेदवारी दिली. Guhagar BJP wins in 5 No Ward

वार्ड क्र. 5 मध्ये केवळ भाजपच्या वैशाली मावळंकर आणि मनसेच्या सिध्दी शेटे यांच्यातच लढत होती. या वार्डात भाजपची ताकद आहे. हे लक्षात घेऊन सिध्दी शेटे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे वार्ड क्र 5 मधून BJP Candidate सौ. वैशाली संतोष मावळंकर बिनविरोध निवडून आल्या आहेत. सिध्दी शेटे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेवून निवडणुक बिनविरोध केल्याबद्दल भाजपच्या उमेदवारी सौ. वैशाली मावळंकर, जिल्हाध्यक्ष सतिश मोरे, तालुकाध्यक्ष अभय भाटकर यांच्यासह भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे आभार मानले आहेत. Guhagar BJP wins in 5 No Ward
Guhagar BJP wins in 5 No Ward
सौ. वैशाली मावळंकर बिनविरोध निवडून आल्यावर युतीच्या कार्यकर्त्यांनी संतोष मावळंकर यांचे अभिनंदन केले. यावेळी भाजपचे माजी आमदार डॉ. विनय नातू, जिल्हाध्यक्ष सतिश मोरे, निवडणुक प्रमुख निलेश सुर्वे, किरण खरे, तालुकाध्यक्ष अभय भाटकर, सरचिटणीस सचिन ओक, शहराध्यक्ष नरेश पवार, संतोष सांगळे, संगम मोरे शिवसेनेचे राजेश बेंडल, तालुका प्रमुख दिपक कनगुटकर, शहराध्यक्ष निलेश मोरे, युवा सेना उत्तर रत्नागिरी जिल्हा समन्वयक अमरदिप परचुरे, प्रदिप बेंडल यांच्यासह युतीचे पदाधिकारी उपस्थित होते.
