किती अर्ज मागे घेतले जातात याकडे सर्व गुहागर तालुक्याचे लक्ष
गुहागर, ता. 20 : गुहागर नगपंचायतीच्या नगरसेवक व नगराध्यक्ष पदासाठी दि. १० नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज भरण्याची सुरुवात झाली होती. १९ नोव्हेंबर पासून २१ नोव्हेंबर पर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. उद्या दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची वेळ असून किती अर्ज मागे घेतले जातात याकडे सर्व तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे. Last date for withdrawal of candidature

गुहागर नगपंचायतीच्या नगरसेवक पदासाठी १७ जागेसाठी ५२ उमेदवारी अर्ज शिल्लक आहेत. तर नगराध्यक्ष पदासाठी एका जागेसाठी पाच अर्ज आहेत. यापैकी किती अर्ज मागे घेतले जातात हे आता बघण्यासारखे आहे. महाविकास आघाडीने १७ ठिकाणी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले असून नगराध्यक्ष पदाचाही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाने स्वतंत्र उमेदवार उभे करून महायुतीतून फारकत घेतली आहे. त्यांनी नगरसेवक पदासाठी सहा उमेदवारी अर्ज तसेच एक नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केला आहे. भारतीय जनता पार्टीने नगरसेवक पदासाठी १४ उमेदवारी अर्ज दाखल केले असून नगराध्यक्ष पदासाठी आपला उमेदवार अर्ज दाखल केला आहे. शिवसेना शिंदे गटाकडून १७ ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केले. असून एक नगरअध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर नगराध्यक्ष पदासाठी एक अपक्ष उमेदवार अर्जही दाखल आहे तसेच नगरसेवक पदासाठी एक अपक्ष उमेदवारी मैदानात आहे. Last date for withdrawal of candidature
महायुती होणार की नाही? हे उद्या दुपारी तीन वाजेपर्यंत स्पष्ट होणार आहे त्यानंतर पुढील राजकारणाची दिशा ठरेल. जर महायुती झाली तर कोणता पक्ष आपले उमेदवारी अर्ज मागे घेणार? हे मात्र उद्या ठरणार आहे. नगराध्यक्ष पदासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून सौ.पारिजात कांबळे, भारतीय जनता पार्टीकडून सौ.नीता मालप, राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाकडून सौ.सुजाता बागकर, शिवसेना शिंदे गटाकडून सौ.मयुरी मुकनाक तर एक अपक्ष उमेदवार एडवोकेट सौ.सुप्रिया वाघधरे अशी पाच नगर अध्यक्ष पदासाठीचे अर्ज दाखल आहेत. यापैकी उद्या किती अर्ज मागे जातात? याकडे सर्व गुहागरवासियांचे लक्ष लागून राहिले आहे. Last date for withdrawal of candidature
