मिलिंद चाचे यांची परिवहन मंत्र्याकडे मागणी
संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 19 गुहागर आगारासाठी कमीत कमी १५ नविन बसेस आणि २० वाहक, चालक, कर्मचारी उपलब्ध करुन द्यावे, अशी आग्रहाची नम्र विनंती वजा आग्रही मागणी कॉंग्रेसचे माजी गुहागर तालुका अध्यक्ष मिलिंद आत्माराम चाचे यांनी महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे. Demand for new buses for Guhagar depot
रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर आगारामध्ये बसेस आणि कर्मचारी कमतरते मुळेच बस फे-या रद्द कराव्या लागत आहेत. त्यामुळे प्रवाशी आणि शालेय विद्यार्थी तसेच कॉलेजच्या विद्यार्थांचेही हाल होत आहेत. तसेच बसफेरी अचानक रद्द होत असल्यामुळे विद्यार्थी वर्गाचे शाळा, कॉलेज यांचे खाडे होत आहेत. त्यामुळे याचा फटका हा विद्यार्थांच्या अभ्यासक्रमावर होत आहे. यामुळे विद्यार्थांचे फार मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. Demand for new buses for Guhagar depot

या निवेदनात कांग्रेसचे माजी गुहागर तालुका अध्यक्ष मिलिंद आत्माराम चाचे यांनी पुढे म्हटले आहे की, जेव्हा बस फे-या रद्द होतात. तेव्हा गुहागर तालुक्यातील, प्रवाशांना, विद्यार्थांना गुहागर आगार मधून बसेस आणि कर्मचारी कमतरतेचे कारण सांगितले जाते आणि ते कारण खरे आहे. तरी परिवहन मंत्री महाराष्ट्र राज्य या नात्याने माझ्या मागणीचा आपण सहानुभूति पुर्वक सकारात्मक विचार करुन गुहागर आगारासाठी त्वरित १५ नविन बसेस आणि २० वाहक, चालक, कर्मचारी उपलब्ध करुन द्यावे, अशी मागणी परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक यांच्याकडे कॉंग्रेसचे माजी गुहागर तालुका अध्यक्ष मिलिंद आत्माराम चाचे यांनी निवेदनाव्दारे केली आहे. Demand for new buses for Guhagar depot
