गुहागर, ता. 17 : कृषिभूषण डॉ.तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था संचलित डॉ. तानाजीराव चोरगे वरिष्ठ कला व वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत कमवा आणि शिका हा उपक्रम घेण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ .अंजलीताई चोरगे, प्रमुख पाहुणे श्री.कृष्णा गावकर, श्री रविंद्र पाटील व प्राध्यापक वृंद उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्वलन व सरस्वती च्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. Earn and Learn Program at Tanajirao Chorge College

प्रमुख पाहुण्यांचे शाल,श्री फळ व पुष्पगुच्छ देऊन कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ.अंजलीताई चोरगे मॅडम यांनी स्वागत केले. यांनतर श्री.रविंद्र पाटील सर यांनी आपल्या मनोगतामधून विद्यार्थ्यांना सेंद्रिय शेती विषयी माहिती दिली. आजकाल धावपळीच्या युगातील आपल्या आहारात केमिकल मिसळलेल्या पदार्थांचां ९०% समावेश असतो. त्यामुळे आपल्याला अनेक आजारांना सामोरे जावे लागते. त्यामुळे या परिस्थिती मध्ये सेंद्रिय शेती किती उपयुक्त आहे. हे विद्यार्थ्यांना आपल्या मनोगता मधून पटवून दिले. Earn and Learn Program at Tanajirao Chorge College
यानंतर श्री कृष्णा गावकर सरांनी कमवा व शिका या उपक्रमाबद्दल विद्यार्थ्यांना उपयुक्त अशी माहिती दिली. वेलनेस सेंटरच्या विविध आयुर्वेदिक प्रोडक्ट बद्दल व फायद्याबद्दल माहिती दिली. विद्यार्थ्यांना शिक्षण घेता घेता डायरेक्ट सिलिंग कसे करावे याबाबत मार्गदर्शन केले. यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्षा सौ अंजलीताई चोरगे मॅडम यांनी आपल्या मनोगतामधून विद्यार्थ्यांना या उपक्रमांत सहभागी होण्यासाठी आव्हान केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्राध्यापक संदीप येलये यांनी केले. Earn and Learn Program at Tanajirao Chorge College
