तालुकाध्यक्ष साहिल आरेकर
गुहागर, ता. 17 : महायुतीतून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष बाहेर पडलेला नाही…, परंतु राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षामध्ये नगरसेवक व नगराध्यक्ष पदासाठी इच्छुकांची संख्या वाढल्याने व कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने स्वतंत्रपणे आज उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष (अजित पवार गट)तालुकाध्यक्ष साहिल आरेकर यांनी सांगितले. आज सोमवारी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने गुहागर नगरपंचायतच्या नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. Candidacy application for the post of corporator and mayor
ते पुढे म्हणाले की, राज्यामध्ये महायुती आहे, त्याप्रमाणे गुहागरमध्ये सुद्धा महायुती व्हावी अशी सर्वांची प्रामाणिक इच्छा होती, महायुतीतील सर्वच पक्षांमध्ये इच्छुकांची संख्या जास्त आहे, त्याचप्रमाणे राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार गट) मध्ये सुद्धा इच्छुक उमेदवारांची संख्या जास्त आहे. Candidacy application for the post of corporator and mayor

त्यामुळे महायुतीच्या शर्यतीत प्रत्येकाला उमेदवारी मिळेल असे नाही, ज्या ज्या प्रभागामध्ये राष्ट्रवादीची कॉंग्रेस पक्षाची ताकद आहे. त्या त्या ठिकाणी राष्ट्रवादीतर्फे उमेदवार उभे करण्यात आले आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या ज्या प्रभागामध्ये जास्तीची ताकद आहे. त्या ठिकाणी उमेदवार उभे करण्यात आले आहेत. त्याचा असा अर्थ नाही की राष्ट्रवादी कॉंग्रेस महायुतीतून बाहेर पडलो. परंतु आमची तयारी सर्व दृष्टीने आहे, त्यामुळे नगरसेवक व नगराध्यक्ष पदासाठी आम्ही उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे, नगराध्यक्ष पदासाठी सुजाता बागकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. Candidacy application for the post of corporator and mayor
त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी राष्ट्रवादी कॉंग्रेसची ताकद आहे. अशा पाच ते सहा जागांवर नगरसेवक पदांसाठी आम्ही उमेदवारी अर्ज भरले आहेत, जरी आम्ही अर्ज भरले असले तरीसुद्धा उमेदवारी अर्ज पाठी घेण्याबाबत अद्यापही त्या पद्धतीची चर्चा झाली नाही, परंतु वरिष्ठ नेते जे निर्णय देतील, त्या निर्णयाप्रमाणे आम्हाला निर्णय घ्यावा लागेल. नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदासाठी होणारी निवडणूक आम्ही लढवणार असलो, तरी वरिष्ठ नेते जो निर्णय देतील तो आम्हाला मान्य असेल, असेही साहिल आरेकर यांनी शेवटी सांगितले. यावेळी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुजाता बागकर, श्रीधर बागकर, दीपक शिलधणकर, संदीप शिलधणकर, तुषार सुर्वे व उमेदवार उपस्थित होते. Candidacy application for the post of corporator and mayor
