उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे दहा उमेदवार अर्ज दाखल
गुहागर, ता. 15 : गुहागर नगरपंचायत चे निवडणुकीचे बिगुल वाजले आहेत. आज उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे दहा उमेदवार अर्ज दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये वार्ड क्रमांक 1 समीर बागकर, वार्ड क्रमांक 3 रिद्धी घोरपडे, वार्ड क्रमांक 6 रिद्धी रहाटे, वार्ड क्रमांक 7 प्रगती वराडकर, वार्ड क्रमांक 8 रिया गुहागरकर, वार्ड क्रमांक 9 वैशाली मालप, वार्ड क्रमांक 10 राजेंद्र आरेकर, वार्ड क्रमांक 12 नीता गुरव, वार्ड क्रमांक 16 राज विखारे, वार्ड क्रमांक 17 श्रिया मोरे या उमेदवारांनी अर्ज दाखल केले असुन महाविकास आघाडीचे 17 नगरसेवक व एक नगराध्यक्ष पदाचे सर्व उमेदवार अर्ज तयार असून उर्वरित उमेदवार रविवार व सोमवार या दोन दिवसात अर्ज दाखल करणार असल्याची माहिती उबाठा शिवसेना तालुकाप्रमुख सचिन बाईत यांनी सांगितले. Candidate applications filed in Guhagar Nagar Panchayat

आज नगरसेवकांचे अर्ज दाखल करताना उबाठा शिवसेना तालुकाप्रमुख सचिन बाईत, राष्ट्रवादी शरद पवार गट तालुका अध्यक्ष पद्माकर आरेकर, गुहागर उबाठा शहर प्रमुख विनायक जाधव, जयदेव मोरे प्रभुनाथ देवळेकर, विनायक बारटक्के, सोहम सातार्डेकर, सारिका कनगुटकर, स्नेहा भागडे, स्नेहा वरंडे, कल्पेश बागकर आदी उपस्थित होते. Candidate applications filed in Guhagar Nagar Panchayat
