• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
12 November 2025, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागरातील राष्ट्रवादी (श.प.)चे कार्यकर्ते नाराज

by Guhagar News
November 12, 2025
in Old News
208 2
0
408
SHARES
1.2k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

पद्माकर आरेकर, निवडणूकीमध्ये उमेदवारच उभा करणार नाही

गुहागर, ता. 11 : कोणत्याही निवडणुकीत गुहागर तालुक्यात मजबूत अलेल्या राष्ट्रवादीला (श.प.) आघाडीचे नेतृत्त्व दुय्यम स्थान देते. याबाबत पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केली तरी कोणतेच सहकार्य मिळत नाही. त्यामुळे गुहागर नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये उमेदवारच उभा करणार नसल्याचे राष्ट्रवादी (श.प.) पक्षाचे तालुकाध्यक्ष पद्माकर आरेकर यांनी स्पष्ट केले आहे. Nationalist activists in Guhagar are Loath

गुहागर नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्र्वभुमीवर महाविकास आघाडीतील घटकपक्ष म्हणून किती जागा लढविणार याबाबत पद्माकर आरेकर यांना एका पत्रकाराने विचारले. त्यावेळी बोलताना पद्माकर आले म्हणाले की, महाविकास आघाडी इथे नावापुरतीच आहे. आघाडीचे नेतृत्व करणारे आम्हाला दुय्यम स्थानच देतात. पण यासाठी त्यांना दोष देण्यात काहीच अर्थ नाही. कारण आमचे वरिष्ठ तरी कुठे आम्हाला न्याय देतात. त्यांच्याकडे तक्रार केली, विचारणा केली तरी उत्तर नसते. गुहागर नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीमध्ये कोणताही निर्णय झालेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) पक्षाकडे किती जागा हव्यात याची विरणाही केली गेली नाही. Nationalist activists in Guhagar are Loath

आघाडीतील मुख्य घटक पक्ष असलेल्या शिवसेना (उबाठा)ने आम्हाला सोबत घेवून कोणतेही निर्णय घेतलेले नाहीत. याबाबत राष्ट्रवादी (श.प.) काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष बने यांना सांगितले असता आघाडीत रहाता येत नसेल तर राहू नका एवढाच सल्ला दिला. जर आमच्या पक्षातील वरिष्ठ असे सांगत असतील तर तालुक्यात, शहरात पक्षाचे काम करणाऱ्या, पक्ष जिवंत ठेवणाऱ्या कार्यकर्त्यांनी काय करावे. त्यामुळे आम्ही नगरपंचायतीच्या निवडणुकीत एकही उमेदवार उभा करायचा नाही असा निर्णय घेतला आहे. असे पद्माकर आरेकर यांनी सांगितले. Nationalist activists in Guhagar are Loath

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNationalist activists in Guhagar are LoathNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share163SendTweet102
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.