गुहागर, ता. 11 : येथील ग्रामदेवत श्री भैरी व्याघ्रांबरी देवस्थानच्या वतीने मंदिरात देव दिवाळी उत्सव शुक्रवार दि. २१ नोव्हेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आला आहे. या देव दिवाळी उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत. तरी सर्व भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन श्री भैरी व्याघ्रांबरी देवस्थान गुहागरचे अध्यक्ष शरद कृ. शेटे, सेक्रेटरी अरुण शं. गुरव, खजिनदार मुरलीधर आ. बागकर व सर्व देवस्थानचे कमिटी सदस्य यांनी केले आहे. Guhagar village deity Bhairi Vyaghrambari festival

देव दिवाळीनिमित्त जत्रा भरणार आहे. तसेच शुक्रवार दि. २१ रोजी पहाटे ५ ते ५.३० वा.काकड आरती, सकाळी ६.३० ते ७.३० वा.अभिषेक व पूजा, सकाळी ९ वा.देवांना रुपे लावणे, सकाळी १० ते रात्रौ ९ वाजेपर्यंत देवदर्शन, रात्रौ १० वाजे पर्यंत गांवातील भजनांचा कार्यक्रम, शनिवार दि. २२ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ९ वा. देवांचे रुपे उतरविणे. आदी कार्यक्रम पार पडणार आहेत. Guhagar village deity Bhairi Vyaghrambari festival
