• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
12 November 2025, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत सागर व समृद्धी विजेते

by Guhagar News
November 11, 2025
in Old News
115 2
5
State ranking carrom tournament at Guhagar

विजेत्यांचा फोटो बसलेले डावीकडून पंकज पवार, सागर वाघमारे, समृद्धी घाडीगावकर आणि आकांक्षा कदम व उभे असलेले डावीकडून यतिन ठाकूर, प्रदीप भाटकर, अमेय परचुरे, प्रकाश परचुरे, प्रदीप परचुरे, अरुण केदार, केतन चिखले, अजित सावंत आणि मिलिंद साप्ते

227
SHARES
648
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 11 : तालुक्यातील भंडारी हॉल, गुहागर येथे संपन्न झालेल्या प्रदीप परचुरे व कॅरम लव्हर्स ग्रुप गुहागर आयोजित राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत पुरुष एकेरी गटाच्या अंतिम सामन्यात पुण्याच्या सागर वाघमारेने ठाण्याच्या पंकज पवारवर २५-२१, २५-१९ अशी सहज मात करून या गटाचे विजेतेपद पटकावले. तर तिसऱ्या क्रमांकाच्या लढतीत मुंबईच्या विकास धारियाने मुंबईच्या निलांश चिपळूणकरला ७-२५, २५-१०, २५-१३ असे हरवले.  तर महिला एकेरीच्या अंतिम फेरीत ठाण्याच्या समृद्धी घाडिगावकरने रत्नागिरीच्या आकांक्षा कदमला रंगतदार लढतीत २१-२५, २४-५ व २२-२० असे हरवून या गटाचे विजेतेपद पटकावले. तर तिसऱ्या क्रमांक प्राप्त करताना मुंबईच्या सोनाली कुमारीने मुंबईच्या रिंकी कुमारीला २५-१३, २५-११ असे हरवले. State ranking carrom tournament at Guhagar

State ranking carrom tournament at Guhagar
विजेत्यांचा फोटो डावीकडून पंकज पवार, सागर वाघमारे, समृद्धी घाडीगावकर आणि आकांक्षा कदम

विजेत्या खेळाडूंना आयोजक प्रदीप परचुरे परिवार, महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे मानद सचिव अरुण केदार, उपाध्यक्ष यतिन ठाकूर, खजिनदार अजित सावंत, सहसचिव केतन चिखले, रत्नागिरी डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप भाटकर, सचिव मिलिंद साप्ते यांच्या हस्ते रोख पारितोषिके, प्रमाणपत्र व चषक देऊन गौरविण्यात आले. State ranking carrom tournament at Guhagar

महिला एकेरी उपांत्य फेरीचे निकाल पुढीलप्रमाणे.

समृद्धी घाडीगावकर ( ठाणे ) वि वि रिंकी कुमारी ( मुंबई ) २५-२३, २५-१
आकांक्षा कदम ( रत्नागिरी ) वि वि सोनाली कुमारी ( मुंबई ) १२-२१, २५-२१, १९-१६

पुरुष एकेरी उपांत्य फेरीचे निकाल पुढील प्रमाणे.

सागर वाघमारे ( पुणे ) वि वि निलांश चिपळूणकर ( मुंबई ) २२-१६, ३-२५, २५-२
पंकज पवार ( ठाणे ) वि वि विकास धारिया ( मुंबई ) २५-११, २१-७

Tags: GuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in GuhagarState ranking carrom tournament at Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share91SendTweet57
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.