पाटपन्हाळे हायस्कूल पटांगण शृंगारतळी येथे आयोजन
गुहागर, ता. 07 : तालुक्यातील पाटपन्हाळे हायस्कूल पटांगण, शृंगारतळी येथे जगदगुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी – दक्षिणपीठ नाणिजधाम यांचा प्रवचन व दर्शन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. हा सोहऴा रविवार दि. 23 नोव्हेंबर 2025 रोजी सायं 5.00 वाजता संपन्न होणार आहे. Narendracharyaji Maharaj Darshan Ceremony

तसेच प्रवचन व दर्शन कार्यक्रमाच्या अनुषंगाने सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन रामानंद संप्रदाय, भक्त सेवा मंडळ, गुहागर तालुका यांच्यातर्फे करण्यात आले आहे. तरी सदर कार्यक्रमाचे सर्व गुरुबंधू-भगिनींनी याचा लाभ घ्यावा. Narendracharyaji Maharaj Darshan Ceremony
