गुहागर, ता. 06 : तालुक्यातील मासू येथील राज पवार याने दर्पणकर बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संस्था नाशिक, भारत सरकार मान्यता प्राप्त वृत्तपत्र विद्या पदविका याचे विहित अभ्यासक्रमांचे अध्ययन करून प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाला. या मिळवलेल्या उल्लेखनीय यशाबद्दल सर्वच स्तरातून त्याचे कौतुक केले जात आहे. Raj Pawar passed the diploma in journalism education

राज याला अगदी विद्यालयीन जीवनापासून लेखनाची आवड होती. पुढे महाविद्यालयीन जीवनात त्याने ही शैली जोपासली. कविता करणे, अनेक विषयावर लेखन करणे हे त्याचे छंद आहेत. जिल्हास्तरावर, राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत प्रथम, काव्यलेखन स्पर्धेत द्वितीय, स्टोरी मिरर यांच्याकडून त्याला Literary Colonel हा किताब देण्यात आला आहे. आयुष्यात आपण काही तरी समाजाचे देणे लागतो, समाजासाठी आपण ही काम केले पाहिजे. या हेतूने त्याने दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संस्था भारत सरकार मान्यता प्राप्त वृत्तपत्र विद्या पदविकेत प्रवेश घेतला. आणि त्यामध्ये त्याने यश मिळवले. यासाठी त्याला प्राध्यापिका कृतिका मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. Raj Pawar passed the diploma in journalism education
