निलेश सुर्वे; शेतकऱ्यांनी ग्रामपंचायत कार्यालयात कागदपत्रे जमा करावी
गुहागर, ता. 04 : सध्या गुहागर तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यात दिवाळीनंतर झालेल्या मुसळधार पावसाने कृषी क्षेत्राचे अतोनात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्यास शासनाकडून सुरुवात झाली आहे. तरी शेतकऱ्यांनी पंचनाम्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे ग्रामपंचायतमध्ये जमा करावीत, असे आवाहन निलेश सुर्वे यांनी केले आहे. Unseasonal rains cause damage to agriculture
गुहागर तालुक्यातील भात शेतीचे प्रचंड नुकसान अवकाळी झालेल्या पावसाने केले आहे. अनेकांच्या शेतातील भात पावसाने पडत्याने भाताच्या लोंब्या चिखल्यात बुडाल्या, पेंढाई फुकट गेला आहे. या अवकाळी पावलाने इतके नुकसान केले की, भविष्यामध्ये गुरांच्या चाऱ्याचा प्रश्नही ऐरणीवर येणार आहे. कोकणातील शेतकऱ्याची भातशेती मुळातच कमी असते. यावेळी शेतातून घरात पुरेल इतके तरी पीक घरात येईल का? याबाबतही साशंकता आहे. Unseasonal rains cause damage to agriculture

तरी या नुकसानीची भरपाई करून शेतकऱ्यांचे दुःख थोडे हलके करावे. यासाठी शासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. सध्या नुकसान ग्रस्त शेतीचे पंचनामे कृषी विभागातर्फे सुरू आहेत. हे पंचनामे करत असताना आवश्यक असलेला शेतीचा सातबारा, आठ अ चा उतारा, शेतकऱ्याची आधार कार्डची झेरॉक्स, बँक पासबुकची झेरॉक्स, शेतकऱ्याचा फार्मर आयडी, आणि झालेल्या नुकसानाची फोटो एवढी माहिती ग्रामपंचायत मध्ये दिल्यास ही पंचनाम्याची कार्यवाही गतीने होऊ शकते. त्यामुळे शेतीच्या नुकसानीच्या छायाचित्रांबरोबरच वरील कागदपत्रे शेतकऱ्यांनी ग्रामपंचायत जमा करावी. अधिक माहितीसाठी ग्राम महसूल अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी यांच्याकडे संपर्क साधावा. असे आवाहन भाजपचे जिल्हा पदाधिकारी निलेश सुर्वे यांनी केले आहे. Unseasonal rains cause damage to agriculture
