• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
7 December 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

भारताच्या ऊर्जा क्षेत्राने दोन ऐतिहासिक टप्पे गाठले

by Guhagar News
October 30, 2025
in Old News
132 1
1
259
SHARES
739
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

एकूण मागणीच्या 50% पेक्षा अधिक नवीकरणीय ऊर्जा निर्मिती

नवी दिल्‍ली, ता. 30 : भारताच्या ऊर्जा क्षेत्राने दोन ऐतिहासिक टप्पे गाठले आहेत, जे देशाच्या स्वच्छ, सुरक्षित आणि आत्मनिर्भर ऊर्जा भविष्याच्या दिशेने होणाऱ्या निरंतर प्रगतीचे प्रतीक आहेत. 30 सप्टेंबर 2025 पर्यंत, देशाची एकूण स्थापित वीज क्षमता 500 गिगावॅट चा टप्पा ओलांडून, 500.89 गिगावॅटपर्यंत पोहोचली आहे. ही कामगिरी ऊर्जा क्षेत्रातील अनेक वर्षांचे दृढ धोरणात्मक पाठबळ, गुंतवणूक आणि सामूहिक प्रयत्नांचे फलित आहे. India’s energy sector reaches historic milestones

भारताच्या वीज क्षमतेचे विभाजन

  • गैरजीवाश्म इंधन स्रोत (नवकरणीय ऊर्जा, जलविद्युत आणि अणुऊर्जा): 256.09 गिगावॅट – एकूण क्षमते पैकी 51% पेक्षा अधिक.
  • जीवाश्म-इंधन-आधारित स्रोत: 244.80 गिगावॅट – एकूण वीज मागणीच्या सुमारे 49%.
  • नवीकरणीय ऊर्जेतील प्रमुख घटक:
    • सौर ऊर्जा – 127.33 गिगावॅट
    • पवन ऊर्जा – 53.12 गिगावॅट

2025-26 (एप्रिल – सप्टेंबर 2025) या आर्थिक वर्षात, भारताने 28 गिगावॅट गैर-जीवाश्म क्षमता आणि 5.1 गिगावॅट जीवाश्म-इंधन क्षमता जोडली –  स्वच्छ ऊर्जेचा वाटा किती वेगाने वाढत आहे, याचे हे निदर्शक आहे. India’s energy sector reaches historic milestones

नवीकरणीय ऊर्जेसाठी एक विक्रमी दिवस

29 जुलै 2025 रोजी, भारताने इतिहासातील सर्वाधिक नवीकरणीय ऊर्जा वाटा गाठला. या दिवशी, देशाच्या एकूण 203 गिगावॅट वीज मागणीच्या 51.5% वीज नवीकरणीय ऊर्जेतून निर्मित झाली.

  • सौर ऊर्जा निर्मिती: 44.50 गिगावॅट
  • पवन ऊर्जा निर्मिती: 29.89 गिगावॅट
  • जलविद्युत निर्मिती: 30.29 गिगावॅट

याचा अर्थ असा की, इतिहासात पहिल्यांदाच, भारताताने एका दिवशी निम्म्याहून अधिक वीज हरित स्रोतांमधून निर्माण केली, ही देशाच्या ऊर्जा क्षेत्रातील परिवर्तनाची महत्त्वपूर्ण पायरी आहे.

राष्ट्रीय उद्दिष्टे नियोजित वेळेपूर्वी साध्य 

या प्रगतीमुळे, भारताने ‘कॉप 26’  च्या ‘पंचामृत’ उद्दिष्टांपैकी एक महत्त्वाचे लक्ष्य – 2030 पर्यंत एकूण वीज क्षमतेपैकी 50 % स्थापित विद्युत ऊर्जा क्षमता गैर जीवाश्म इंधन स्रोतांपासून साध्य करणे,  हे उद्दिष्ट नियोजित वेळेपेक्षा पाच वर्षे आधीच साध्य केले आहे. ही कामगिरी भारताच्या स्वच्छ ऊर्जा संक्रमणातील जागतिक नेतृत्वाची साक्ष देते, ज्यात वीज ग्रिडची स्थिरता आणि विश्वासार्हता कायम राखण्यात यश मिळाले आहे.

भारताच्या नवीकरणीय ऊर्जा उपक्रमामुळे उत्पादन, प्रतिष्ठापन, देखभाल आणि नवोन्मेष क्षेत्रात नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत – ज्याचा ग्रामीण आणि शहरी युवकांना थेट लाभ होत आहे. ऊर्जा मंत्रालय तसेच नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय (MNRE) यांनी या ऐतिहासिक कामगिरीसाठी सर्व वीज निर्मिती कंपन्या, ट्रान्समिशन युटिलिटीज, सिस्टम ऑपरेटर आणि राज्य संस्थांचे अभिनंदन केले आहे. India’s energy sector reaches historic milestones

Tags: | India's energy sector reaches historic milestonesGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share104SendTweet65
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.