• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
28 October 2025, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

दापोली विंटर सायक्लोथॉन स्पर्धा

by Guhagar News
October 24, 2025
in Old News
133 1
0
Dapoli Winter Cyclothon Competition
261
SHARES
747
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

दि. २६- २७ ऑक्टोबर रोजी दापोली होणार सायकलमय

सायकल चालवण्याचे अनेक फायदे आहेत. सायकल संस्कृती वाढावी व सायकलबद्दल आवड निर्माण व्हावी या हेतूने दापोली सायकलिंग क्लबतर्फे २६ व २७ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी दापोली विंटर सायक्लोथॉन २०२५, सिझन ८ स्पर्धेचे आयोजन सोहनी विद्यामंदिर मैदान दापोली येथे करण्यात आले आहे. यासाठी राज्यातील अनेक नावाजलेले सायकलस्वार आपल्या कुटुंबासह दापोलीत येणार आहेत. Dapoli Winter Cyclothon Competition

सायकलिंग क्रीडाप्रकारात वय हद्दपार करणारे आणि नुकतीच ३४४४ किमीची दिल्ली- कोलकाता पुणे राईड केलेले पुणे येथील ७९ वर्षीय गौतम भिंगानिया, यूरोप खंडातील ८ देशातूम जाणारी प्रसिद्ध अशा नॉर्थ केप ४००० ह्या ४००० किमीच्या सायकल स्पर्धेत सहभागी झालेले पुण्यातील विश्वनाथन सर, देशातील अनेक लांबच्या राईड केलेले विद्याधर पालकर, फिरोझ खान इत्यादी अनेक रायडर्स दापोली सायक्लोथॉन मध्ये सहभागी होऊन सायकल चालवणार आहेत. देश विदेशात सायकलिंग केलेल्या या सर्वांचे प्रेरणादायी अनुभव ऐकणे, त्यांच्याशी गप्पा गोष्टी करणे नक्कीच पर्वणी असणार आहे. Dapoli Winter Cyclothon Competition

ही सायकल स्पर्धा १ ते २०० किमी अंतराची असून ५० किमी किंगफिशर सिनिक रुट, ४ ते २०० किमी शॉर्ट सिटी लूप, फन राईड अशा गटात होणार आहे. प्रत्येक स्पर्धकाला आकर्षक मेडल आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येईल. शॉर्ट सिटी लूप मार्गावर ७५, १००, १२५, १५०, १७५, २०० किमी सायकल चालवणाऱ्या स्पर्धकांना प्रत्येकी ३००, ४००, ५००, ६००, ७००, ८०० रोख रक्कम बक्षिस असेल. शिवाय इतर काही खास बक्षिसे पण असतील. ५० किमी किंगफिशर सिनिक रुट सायक्लोथॉन मार्ग सोहनी विद्यामंदिर दापोली ते जालगाव, उंबर्ले, ओळगाव, किन्हळ, देवके, बुरोंडी, लाडघर, कर्दे, मुरुड, सालदुरे, पाळंदे, आसूद, दापोली असा समुद्रकिनाऱ्यावरील गावातून असेल. राईड मार्गावर स्वयंसेवक, पाणी, फळे, स्नॅक्स, बॅकअप टेम्पो, मेडिकल मदत असेल. अधिक माहितीसाठी संपर्क नंबर ८६५५८७४४८६, ८७६७२८५८२७, ९०२८७४१५९५ हे आहेत. Dapoli Winter Cyclothon Competition

Dapoli Winter Cyclothon Competition

Tags: Dapoli Winter Cyclothon CompetitionGuhagarGuhagar NewsLatest Marathi NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share104SendTweet65
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.