गुहागर, ता. 24 : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली आयोजित आंतर महाविद्यालयीन सांस्कृतिक युवा महोत्सव ‘मयूरपंख २०२५’ मध्ये कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था संचलित गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय, मांडकी-पालवणच्या विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक प्रकारांमध्ये घवघवीत यश संपादन केले आहे. Success of Mandaki-Palvan Agricultural College
दिनांक १५ ते १७ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, दापोली येथे आयोजित ‘मयूरपंख २०२५’ या सांस्कृतिक कार्यक्रमात या महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी “भारतीय लोकनृत्य” या प्रकारात तृतीय क्रमांक पटकावला. यासोबतच ललित कलांमध्येही विद्यार्थ्यांनी लक्षणीय यश मिळवले. कोलॅज मेकिंग या प्रकारामध्ये कु. श्रावणी कदम हिने द्वितीय क्रमांक प्राप्त केला. तसेच, पोस्टर मेकिंग या प्रकारामध्ये कु. पियुष सलोखे आणि क्ले मॉडेलिंग या प्रकारात कु. जतीन पाटणकर या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक मिळवून महाविद्यालयाचा गौरव वाढवला. भारतीय लोकनृत्य प्रकारात कु. प्रीती पेरवी, कु. लावण्या पांढरे, कु. श्रावणी भिसे, कु. देवयानी गुरव, कु. तेजल भिंगारदेवे, कु. दीक्षा कांबळे, कु. श्रावणी कदम, कु. प्राजक्ता कुंभार व कु. साक्षी कदम या विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. Success of Mandaki-Palvan Agricultural College

या विद्यार्थ्यांच्या यशासाठी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. निखिल चोरगे, गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संकेत कदम, जिजामाता महिला कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शमिका चोरगे, उपप्राचार्य श्री. बाळासाहेब सूर्यवंशी, सांस्कृतिक कार्यक्रम समन्वयक प्राध्यापक प्रशांत इंगवले, प्राध्यापिका सिद्धी फरांदे, प्राध्यापिका सिद्धि नाईक यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. Success of Mandaki-Palvan Agricultural College
